द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

Workshop for grape farmers
Workshop for grape farmers

मोहोळ : पापरी (ता. मोहोळ) आणि परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवार (ता 22) रोजी सेंद्रिय शेती व शेतमाल निर्यात कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती शिवकृपा फार्मर्स क्लबचे अध्यक्ष तथा कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी समाधान भोसले यांनी दिली.

कार्यशाळेचे आयोजन शिवकृपा फार्मर्स क्लब, कृषि पदवीधर संघटना, उद्योग भारती, रेडिअन्स क्रॉप कल्चर, शेतकरी एग्रो प्रोड्यूसर कंम्पनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात  आले आहे. पापरी येथील स्वयंभू महादेव मंदिर येथे सायंकाळी सात वाजता  कार्यशाळा संपन्न होणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी प्रवेश खुला व मोफत आहे.

कार्यशाळेत कृषि आयुक्तालय पुणे येथील निर्यात कक्षातील तंत्र अधिकारी गोविन्द हांडे, नाशिक येथील द्राक्ष निर्यातदार विनोद लगडे मार्गदर्शन करणार आहेत. तर कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष-महेश कडूस पाटिल, धीरज कदम, आदींची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com