विसर्जन मिरवणुकीदरम्यान महापौरांना पोलिसांची धक्काबुक्की

mayor
mayor

कोल्हापूर : मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरवातीलाच महापौर आणि उपमहापौर यांना पोलिसांकडून धक्का-बुक्कीचा करण्यात आली.

गणेश विसर्जन मिरवणुकीला कोल्हापूरचा मनाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पूजनाने सुरवात होते. या वेळी पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असते. आज (ता. 23) पालखी पूजन आणि श्रींच्या आरतीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्का बुक्की केली. या वेळी येथे उपस्थित असणाऱ्या अनेक माध्यम कर्मीना देखील पोलिसांच्या ह्या अरेराविचा सामना करावा लागला. मिरवणुकीच्या सुरवातीलाच हा प्रकार घडल्यामुळे काही काळासाठी परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

मंत्र्यांभवतीची अशी सुरक्षा पहिल्यांदाच बघायला मिळाली. महापौर म्हणून असणारा मान देखिल दिला गेला नाही. अशी अरेरावी कोल्हापूरमध्ये आजपर्यंत कधीच झाली नाही आहे. याचा मी निषेध करते.
- शोभा बोन्द्रे , महापौर
 
गेली अनेक वर्ष चालत आलेल्या ह्या परंपरेला आज गालबोट लागले. हा प्रकार निंदनीय आहे.
- महेश सावंत, उपमहापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com