कऱ्हाड : कृष्णा नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

dead body
dead body

मलकापूर (ता. कऱ्हाड) : कृष्णा नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. पाचवडेश्वर (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी ही घटना घडली. संबंधित व्यक्ताचा मृतदेह काल येथील नदीपात्रात आढळून आला. कमाल हुसेन शेख ( वय ५५ रा. नारायणवाडी)असे नदीत संबधिताचे नाव आहे. 

पोलीसांची माहिती अशी, कमाल शेख शनिवारी दुपारी नारायणवाडी येथून पाचवडेश्वर मंदीरानजीक मासे पकडण्यासाठी व कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीकडे गेले होते. सायंकाळपर्यंत ते घरी परत आले नसल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केली.

नदीपात्रालगत सापडलेल्या साहित्यावरून शेख नदीत बुडाले आसावेत असा अंदाज केला. मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. रविवारी दुपारी पाचवडेश्वर मदीर पाणवठ्यापासून कांही अंतरावर एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे कांही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती पोलीसांसह शेख यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. पोलीस व नातेवाईकांनी पाहिले असता नदीपात्रात तरंगत असलेला मृतदेह शेख यांचाच असल्याचे सिद्ध झाले. घटनेची नोंद पोलीसात झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com