पार्टीला गेलेल्या युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कऱ्हाड - नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील ढोकरमळा नावाच्या शिवारात पार्टी करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. त्यातूनच एकाचा निर्घृण खून झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अभिजित भीमराव काळे (वय 28, रा. नांदगाव, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, त्याचे वडील भीमराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेथीलच संतोष मारुती औताडे (वय 30) याला ताब्यात घेतल्याचे तालुका पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना सांगितले.

अभिजित मित्रांसमवेत काल (सोमवारी) रात्री नऊच्या सुमारास नांदगाव ते विंग रस्त्यावरील पवारवाडी गावच्या हद्दीतील शिवारात गेला. तेथे जाऊन त्यांचे पार्टी करण्याचे नियोजन असावे. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वाद होऊन भांडणे झाली. त्यानंतर अभिजितच्या मित्राने तेथून पलायन केले. मंगळवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या लोकांना ढोकरमळा शिवारात अभिजित काळे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी हा प्रकार पवारवाडीचे पोलिस पाटील दिलीप पाटील यांना सांगितला. त्यांनी कऱ्हाड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस निरीक्षक मांजरे, विवेक पाटील, प्रकाश राठोड, ए. एस. माने यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अभिजितच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अभिजितचे वडील भीमराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अभिजित त्याचा मित्र संतोष औताडे याच्या बरोबर जातो म्हणून घरात सांगून गेला. रात्री तो घरी आला नाही. आज सकाळी त्याचा मृतदेह दिसला. तो प्रकार संतोष औताडेनेच केला असावा, असे म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी संतोषला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Web Title: youth murder in karad

टॅग्स