भाऊबिजेला युवकाचा खून, मतिमंत बहिण झाली पोरकी

Adarsh Waghmare
Adarsh Waghmare

सांगली - येथील न्यू टिंबर एरियात भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आला. आदर्श उर्फ नरसू मल्हारी वाघमारे (वय 18, रा. न्यू टिंबर एरिया) असे त्याचे नाव असून भाऊबिजेच्या रात्री त्याची खून झाल्याने त्याची मतिमंद बहिण पोरकी झाली. आई-वडीलांच्या मृत्यूनंतर नरसू यानेच तिचा सांभाळ केला होता.

दरम्यान, या खून प्रकरणी मुख्य आरोपा संतोष दादासाहेब ठोकळे (रा. न्यू टिंबर एरिया) याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार नितीन बाळू ठोकळे आणि सोनू उर्फ योगेश रवी पाटील हे दोघे पसार झाले आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, नरसू काल रात्री घरी झोपला होता. त्याच्या मित्राने गल्लीत भांडण सुरु आहे, बघायला चल म्हणून त्याला उठवून नेले. भीमकट्टा येथे संतोष ठोकळे व त्याचे साथीदार मद्यपान करून बसले होते. तेथून वृद्ध अक्काताई सनदी घराकडे निघाल्या होत्या. संतोष याने त्यांना शिवीगाळ केली. त्यातून अक्काताई, त्यांचा नातेवाई सूरज सनदी यांनी संतोषला जाब विचारला. भांडण जोरात जुंपले. त्यात नरसू याने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष याने चाकू काढून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला. नरसू याने अक्काताई यांची बाजू घेतल्याच्या रागाने संतोष याने त्याच्या छातीवर चाकूचा जोरदार वार केला. चाकूचा हृदयावर वर्मी घाव बसल्याने नरसू तेथेच कोसळला. शेजारील रुग्णालयात नेवूनपर्यंत त्याचा श्‍वास थांबला होता. या प्रकारानंतर संतोषचे साथीदार योगेश व नितीन पळून गेले. या भांडणात संतोष यालाही चाकू लागला. तो तसाच विश्रामबाग पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

* बहिण पोरकी...
नरसूची आई सुनिता वाघमारे या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. नरसू लहान असताना वडील वारले. एक मोठा भाऊ आणि मतिमंद बहिणीसह तो रहात होता. बहिणीचे सारे तोच करायचा. काल भाऊबीज. दिवाळीसाठी त्याने गवंड्याच्या हाताखाली कामाला जावून स्वतःला व बहिणीला नवे कपडे खरेदी केले होते. त्याच्या मृत्यूने ती आता पोरकी झाली आहे. आज पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरसू निपचीत पडलेला पाहून ती बिथरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com