देश घडविण्यासाठी तरुणांचे संघटन हवे

देश घडविण्यासाठी तरुणांचे संघटन हवे

सोलापूर - देश महासत्ता बनला पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी तरुणांचे संघटन हवे. तरुणांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व योग्य प्रेरणा असेल तर देश महासत्ता होणे शक्‍य आहे. तरुणांनी मानसिकता बदलून स्वत:मध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. या ‘समिट’मधील विचार तरुणाईला गती देणारे असतील, असा सूर विविध वक्‍त्यांच्या संवादातून बुधवारी (ता. २४) येथे व्यक्त झाला. निमित्त होते, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) ‘समर यूथ समिट २०१७’चे. 

येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात लक्ष्मी हायड्रोलिक्‍सचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्‍ण ठाकरे यांच्‍या हस्‍ते ‘समिट’चे दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन झाले. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्‍थानी होते. या वेळी व्‍यासपीठावर सिंहगड संस्थेचे कॅम्पस डायरेक्‍टर संजय नवले, एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले-पाटील, जय ॲकॅडमीचे संचालक असिफ यत्नाळ, ग्रेस ॲकॅडमीचे संचालक मार्शल दास, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे आदी उपस्‍थित होते. 

उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, स्टार्टअप, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर संघर्षपूर्ण वाटचालीतून साधलेल्या यशाचे गमक स्पष्ट करत वक्‍त्यांनी तरुणाईला प्रेरणा दिली.

या वेळी दिवाणजी म्हणाले, समिटमधून तरुणांना खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याचा उपयोग त्यांना पुढील वाटचालीसाठी होणार आहे. प्रास्ताविकमध्ये दाडगे यांनी समिटची माहिती सांगून ही समिट तरुणाईला नक्की गती देईल, असा विश्‍वास व्यक्त केला. संजय नवले यांनी आभार मानले. यिन सदस्य आनंद मसलखांब यांनी सूत्रसंचालन केले.

देशाला महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी मानसिकता बदलली पाहिजे. आपल्याकडून देश खूप अपेक्षा करत आहे. विद्यार्थिदशेत तो नेता घडावा म्हणून २०१६ च्या विद्यापीठ कायद्यात निवडणुकीची सोय केली आहे. त्यांनी उद्योजकतेमध्येही पुढे आले पाहिजे. तो घडला तरच देश घडणार आहे.
- डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

देश घडविण्यासाठी तरुणांनी योगदान देण्याची गरज आहे. देश महासत्ता होण्याचे डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सर्वांनी योगदान द्यावे. निश्‍चित ध्येय आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर उद्योग, सामाजिक यासह कोणत्याही क्षेत्रात त्याला सहज यश मिळते.
- डॉ. शंकर नवले, प्राचार्य,  एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क घ्यावीच लागते. ही रिस्क घेण्याआधी पुढे कोणत्या गोष्टी होतील, याचाही विचार करायला हवा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी निर्णय हा घ्यावाच लागतो. एखादा दुसरा निर्णय चुकूही शकतो. मात्र निर्णय घेणे, हे लीडरचे कामच आहे. या निर्णयातूनच तुम्ही पुढे जाल.
- शरदकृष्ण ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक, लक्ष्मी हायड्रोलिक्‍स

थोडक्‍यात...
तरुणाईला गती देणारे शिबिर
देश महासत्ता बनला पाहिजे, ही सर्वांची इच्छा
कोणत्याही सामूहिक कामात संघटन हवं
तरुणांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन हवा
तरुणांकडून देशाला खूप अपेक्षा
मानसिकता बदलण्याची गरज
संघर्षपूर्ण वाटचालीतून यश
विद्यार्थिदशेत नेता घडावा म्हणून निवडणुकीची सोय
उद्योजकतेमध्ये तरुणांनी पुढे यावे
देशासाठी तरुणांनी योगदान देण्याची गरज
ध्येय निश्‍चित आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळते
‘समिट’मधून तरुणांना खूप काही शिकायला मिळणार
यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क हवीच
पुढे जाण्यासाठी निर्णय घ्यावाच लागतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com