तरुण, महिलांचा मतदानात उत्साह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सांगली - अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत झाले. तरुण, महिलांचा उत्साह होता. उमेदवार, समर्थकांकडून अखेरपर्यंत मतदान खेचण्याची स्पर्धा सुरू होती. ने-आण करण्यास सरसकट वाहनांची व्यवस्था केली होती. एकेका मतासाठी संघर्ष सुरू होता. सुगीच्या दिवसात मतदार सकाळी शेत 
कामांत व्यस्त होता. दुपारनंतर मतदान चांगले झाले. 

सकाळी साडेसातनंतर पहिल्या दीड तासात मतदानाची गती संथ होती. सकाळी साडेअकराच्या दरम्यान २२ ते २४ टक्के, दीडपर्यंत ३९ टक्के मतदान झाले. सुगी सुरू असल्याने मतदार शेतीत व्यस्त होता. दुपारी दोननंतरच मतदानाला वेग आला. सुशिक्षित मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. 

कार्यकर्ते नेते, उमेदवारांच्या संपर्कात होते. ‘साहेब इथं बिघडलंय’, असा निरोप येताच त्या भागात उमेदवार, कार्यकर्ते धावाधाव करीत. कार्यकर्ते दबक्‍या आवाजात पक्षांचे चिन्ह, खूण दाखवून ‘मतदान करा’, असा संदेश देत होते. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी यंदा यादीबरोबर शासनाच्या ॲपचा सर्रास वापर झाला. 

कवलापूर, बुधगाव, सोनीत मतदानाला चांगला प्रतिसाद
कवलापूर - सोनी, कवलापूर, बुधगाव, माधवनगर परिसरात आज उत्साहात मतदान झाले. सोनीत सकाळी साडेनऊच्या दरम्यान साडेनऊ टक्के मतदान झाले. कांचनपूर येथे सकाळी साडेदहा वाजता १८ टक्के मतदान झाले. सुगीचे दिवस असल्यामुळे मजूर, शेतकऱ्यांनी दुपारी तीननंतर मतदान केले.  कवलापूरच्या जिल्हा परिषद शाळा एकमधील केंद्रावर साडेअकरा वाजता महिलांची गर्दी होती. दुपारी समर्थकांची बूथवर गर्दी झाली होती.

Web Title: youth women interested in voting