"सांगलीत सावली गायब"

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

सांगली : “आपली सावली कायमच आपली सोबत करते” असं आपण म्हणतो. स्वतःची किंवा एखाद्या वस्तूची बाजूला पडणारी सावली नेहमी पाहतो; पण रविवारी दुपारी 12.20 वाजता सांगलीमध्ये ही सावलीच गायब झाली अन् सागंलीकरांनी 'शून्य सावली'चा अनुभव घेतला. 

उत्तर गोलार्धात सरकणारा सूर्य रविवारी बरोबर सांगली शहराच्या माथ्यावर होता. त्यामुळे रविवारी मध्यान्हाला सर्व वस्तूंच्या सावल्या काही काळ त्यांच्या पायाखाली गायब झाल्या. सर्व बाजूंना सूर्यप्रकाश, शून्य सावली अनुभवायला मिळाली.

(व्हिडिओ : उल्हास देवळेकर)

साधारणपणे २२, २३ डिसेंबर आणि २१ जूनपासून अनुक्रमे सूर्याच्या उत्तरायण व दक्षिनायणावेळी कर्क व मकर वृत्तांदरम्यानच्या प्रदेशात वर्षातून दोन वेळा सूर्य माथ्यावरून (आपल्या अक्षांशावरून) प्रवास करतो तेव्हा हा  शून्य सावलीचा अनुभव येतो.  आपल्याकडे मे व जुलै महिन्यांत सूर्य डोक्यावरून जातो. पण जुलैमध्ये पावसाळा असल्याने आपण वर्षात एकदाच हा अनुभव घेऊ शकतो.

मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यानी दिलेल्या माहितीनुसार ६ ते २० मे या काळात महाराष्ट्राच्या विविध शहरात सावली विरहित क्षण अनुभवता येतील. ६ मे कोल्हापूर, ७ मे सांगली, 8 मे कराड, ९ मे चिपळूण, १० मे सोलापूर व साताराव दापोली पुण्यात १३ मे, १५ मे दक्षिण व नवी मुंबई, १६ मे नांदेड, पाभणी, अहमदनगर, १७ मे शनि शिंगणापूर, १८ मे संगमनेर, १९ मे जालना, २० मे नाशिक असे वेळापत्रक आहे.

एखाद्या सपाट पृष्ठभागावरकिंवा काचेच्या टेबलावर डबा, ग्लास किंवा पाईप ठेवली तरी त्याची वर्तुळाकार सावली तळात पहायला मिळेल. रविवारीमध्यान्हाला सांगलीत काही काळ सावली गायब झाली. ते खालील सावल्यांच्या प्रयोगानेही सिद्ध झाले.
   
Web Title: zero shadow day in sangli on sunday

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी