झेडपी, पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता 26 जानेवारीपासून

विष्णू मोहिते
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

सांगली - राज्यातील 26 जिल्हा परिषदा आणि 296 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता 26 जानेवारी 2017 पासून लागू होईल, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर 35 ते 40 दिवसांत म्हणजे फेब्रुवारी 2017 च्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल. विद्यमान पदाधिकारी, सदस्यांना कामांसाठी 26 जानेवारीपर्यंतचा काळ बोनस मिळणार आहे. फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर 2011 मध्येच लागली. त्यावेळी निवडणूक निकालानंतर जुन्या सदस्य, पदाधिकाऱ्यांनी एक सर्वसाधारण सभाही घेतली होती.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी सन 2017 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश काल (ता. 22) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यात त्यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस 21 जानेवारी 2017 असेल असे स्पष्ट केले आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणूक आचारसंहिता व कार्यक्रमाची घोषणा होईल. तशी परंपराच आहे. 21 जानेवारीनंतर केव्हाही आचारसंहिता लागू केल्यास प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाबद्दल लोकप्रतिनिधींना मर्यादा येतात. त्यामुळे 2007 मध्ये 26 जानेवारीनंतर आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. तशीच स्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आचारसंहिता लागू केल्यानंतर 35 ते 45 दिवसांत प्रत्यक्ष मतदान होते. म्हणजेच ते फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होईल. पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडी 14 मार्च तर झेडपीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी 21 मार्चपूर्वी व्हाव्यात, अशा पद्धतीने निवडणूक कार्यक्रम तयार केला जातो.

मतदार यादी कार्यक्रम
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. विधानसभेसाठी तयार मतदार यादीच वापरली जाते. विधानसभा निवडणुकीसाठी 5 जानेवारी 2017 रोजी तयार असलेली यादी गट व गणांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यावरून 12 जानेवारी 2017 रोजी मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. याद्यांवर सूचना, हरकतीसाठी अंतिम मुदत 17 जानेवारी 2017 आहे. अंतिम मतदार यादी 21 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीच्या कार्यक्रमातून ठाणे, पालघर, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया येथील जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन वर्षांपूर्वी झाल्या आहेत. तर मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा नागरी क्षेत्र ते वगळले आहेत.

दृष्टिक्षेपात...
निवडणूक आचारसंहिता - 26 जानेवारी 2017 नंतर
पंचायत समिती सभापती निवडी - 14 मार्च 2017
झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी - 21 मार्च 2017