होऊद्या तोऱ्यात, मतदान जोरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या (ता. २१) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत दोन हजार ५८४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया होत आहे. मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी विविध प्रकारच्या १८ कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आपल्यासोबत घेऊन जावे लागणार आहे. केंद्रावर मतदार यादीतील क्रमांक सांगितल्यावर संबंधित अधिकारी त्या नागरिकाचे नाव यादीत आहे की नाही, याची खात्री करेल. आपण तीच व्यक्ती आहात, याचा पुरावा मागेल. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या १८ प्रकारच्या कागदपत्रांपैकी जे उपलब्ध असेल, ते आपल्यासोबत घेऊन जावे.

मतदानाला जाताय... हे न्या सोबत! 
निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली फोटो असलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयीकृत बॅंक किंवा टपाल कार्यालयाकडील खातेदारांचे फोटो असलेले पासबुक, स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र, निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याने विशेष मागासवर्गीयांना फोटोसह दिलेले प्रमाणपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने फोटोसह दिलेला अपंगत्वाचा दाखला, मालमत्ता नोंदीबाबतची कागदपत्रे, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत फोटोसहित देण्यात आलेला शस्त्रास्त्र परवाना, निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच्या तारखेपर्यंत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली फोटो असलेले ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटोसह असलेले पासबुक, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड, रेशनकार्ड.

मतदान करणे ही सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवावा. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे, स्वाभिमानाने, अभिमानाने मतदान करा.
- आश्‍विन मुद्‌गल, जिल्हाधिकारी 

क्‍युआर कोड स्कॅन करा...
क्‍युआर कोडच्या माध्यमातून चित्रफित पाहता येईल. त्यासाठी प्ले स्टोअरमधून क्‍युआर कोट रीडर स्कॅनिंग हे ॲप डाउनलोड करून घ्या. क्‍युआर कोडवर स्पष्ट दिसेल असा मोबाईल धरा. यावेळी तुमचा मोबाईल आपोआप क्‍युआर कोड स्कॅन करेल आणि मोबाईलवरून वेबलिंक पाहायला मिळेल. त्याला क्‍लिक केल्यावर जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांची मतदान करण्याबाबतच्या आवाहनाची चित्रफित पाहता येईल.

Web Title: zp & panchyat committee election