सांगली ‘झेडपी’चे अध्यक्षपद खुले

सांगली ‘झेडपी’चे अध्यक्षपद खुले

सांगली - जिल्हा परिषदेचे सन २०१७-२२ या काळातील अध्यक्षपद पहिली अडीच वर्षे खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने अनेक मातब्बर दावेदारांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष काँग्रेससह केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना पक्षाच्या दीड खासदार आणि पाच आमदारांना आपली ताकद दाखवावी लागेल. दहा पंचायत समित्यांसाठी सभापतिपदासाठीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही. सध्या दहापैकी सहा पंचायतीवर राष्ट्रवादी, तीन पंचायत समितीवर काँग्रेसची आणि शिराळा पंचायतीवर संयुक्त सत्ता आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यात तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. शिवाय काही तालुक्‍यांत तडजोडीच्या आघाड्याही तयार होण्याची शक्‍यता आहे. पक्षीय पातळीवरही काही ठिकाणी कमकुमत उमेदवार दिले जातील, अशी चर्चा आहे. प्रमुख चार पक्षांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही स्वबळावर लढण्याची खुमखुमी दाखवली आहे. काँग्रेस मात्र स्वाभिमानी आमच्यासोबत असेल असे सांगत आहेत.

आरक्षण जाहीर झाल्यामुळे पत्ते खुले झाले. राजकीय पक्षांनी उमेदवारांची शोधमोहीम होती घेतली आहे. विशेषतः खुल्या गटासाठीच्या १९ मतदारसंघांत काटा लढत पहायला मिळेल. झेडपीचे ६० गट, पंचायत समितीच्या १२० गणांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक अपेक्षित आहे. 
खुले गट ( १९) - कवलापूर, नागेवाडी, उमदी, सावळज, जाडर बोबलाद, चिकुर्डे, विसापूर, खरसुंडी, कुंडल, भिलवडी, चिंचणी, बोरगाव, कसबे डिग्रज, डफळापूर, कोकरुड, बागणी, मणेराजुरी, कडेपूर, अंकलखोप.

दृष्टिक्षेपात
निवडणूक आचारसंहिता - 
६ जानेवारी २०१७ नंतर
फेब्रुवारी २०१७  पहिल्या आठवड्यात मतदान
दहा सभापती निवडी - १४ फेब्रुवारी २०१७
झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड - २१ फेब्रुवारी २०१७

अध्यक्षपदाचे दावेदार...
कवलापूरचे निवासबापू पाटील, बोरगावचे झेडपीचे माजी सदस्य जितेंद्र पाटील, चिकुर्डेतून अभिजित पाटील, सावळजहून राजू मोरे, जाडर बोबलादमधून बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, खरसुंडीतून जयदीप भोसले, कुंडलमधून महेंद्र लाड, शरद लाड, भिलवडीतून संग्राम पाटील, चिंचणीतून अविनाश पाटील, कसबे डिग्रजमधून संग्राम पाटील, डफळापुरातून दिग्विजय चव्हाण, मन्सूर खतीब, बागणीतून वैभव शिंदे, अंकलखोपमधून दादासाहेब सूर्यवंशी, उमदीतून ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, विसापुरातून झेडपीचे माजी सदस्य सुनील पाटील आदी निवडणूक रिंगणात उतरून प्रबळ दावेदार ठरू शकतात. याशिवाय काही इच्छुक शेजारील खुल्या मतदारसंघातूनही निवडून येण्याची शक्‍यता असल्याने ही यादी आणखी वाढू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com