सोलापूर जि. प. शाळेतील शिक्षकांची 706 पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात 706 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदाचा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 21 हजार विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या परिणामाकडे जिल्हा प्रशासन सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून एकूण दोन लाख 13 हजार 583 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षकांची एकूण दहा हजार 669 पदे मंजूर आहेत. यामध्ये मुख्याध्यापक 410, विषय शिक्षक एक हजार 459 तर सहशिक्षक आठ हजार 93 असे एकूण नऊ हजार 962 शिक्षक कार्यरत आहेत.

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात 706 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदाचा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 21 हजार विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या परिणामाकडे जिल्हा प्रशासन सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून एकूण दोन लाख 13 हजार 583 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षकांची एकूण दहा हजार 669 पदे मंजूर आहेत. यामध्ये मुख्याध्यापक 410, विषय शिक्षक एक हजार 459 तर सहशिक्षक आठ हजार 93 असे एकूण नऊ हजार 962 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजेच मुख्याध्यापकांची 123, विषय शिक्षकांची 174 तर सहशिक्षकांची 409 अशी एकूण 706 पदे रिक्त आहेत.