निरोपाच्या सभेची आशा मावळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचे शेवटचे वर्ष वादळी ठरले. पदाधिकारी बदलाच्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे शेवटची सभा तरी गोडीगुलाबीची होईल, अशी आशा पदाधिकारी, सदस्यांना लागली होती. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत सभेच्या आयोजनाकडे कोणाचे लक्षच राहिले नसल्याने त्यामुळे तारीख ठरविणे, नोटिसा पाठविण्याचे राहून गेल्याने आता निरोपाच्या सभेची आशाही मावळली आहे.

जिल्हा परिषदेच्या मावळत्या सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी अत्यल्प म्हणजे २० मार्चपर्यंत राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात मावळत्या सदस्यांचा कालावधी सभागृहाला उंचीवर नेणारा तसेच मान खाली घालण्यास लावणाराही ठरला. २०१६ मध्ये सत्ताधारी पदाधिकारी, सदस्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेतून उठवलेल्या वादळामुळे सभागृह वादळी ठरले. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही पुन्हा ‘राष्ट्रवादी’ची सत्ता बहुमताने आली आहे. नवीन सदस्यांचा कालावधी २१ मार्चपासून सुरू होत असल्याने त्यापूर्वी मावळत्या पदाधिकारी, सदस्यांची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी काहींच्या हालचाली सुरू होत्या. 

मात्र, सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी १२ दिवस पदाधिकारी, सदस्यांना नोटिसा देणे आवश्‍यक असते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापतीही सदस्य आहेत. त्यांचा कालावधी १४ मार्चला पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यापूर्वी तरी सभा होणे आवश्‍यक होते. त्यादृष्टीने आतापर्यंत सभा होणे आवश्‍यक होते. मात्र, ते होणे अडचणीचे असल्याने आता मावळत्या सदस्यांना निरोपाची सभा घेण्याची असलेली आशा मावळली आहे. 

सन्मानचिन्ह राहून गेले...
जानेवारीमधील सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले होते. त्यावेळी खंडाळ्याचे सभापती नितीन भरगुडे-पाटील हे पुढील पंचवार्षिकला जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून येणार असल्याने, निवृत्त होणार नसल्याचे सांगत सन्मानचिन्ह न घेताच सभागृहातून बाहेर पडले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने आता पुढील पंचवार्षिकची त्यांना मेहनत घ्यावी लागेल.

Web Title: zp send up meeting