चालकाचा ताबा सुटल्याने वाकड येथे मुळा नदी पात्रात बस कोसळली

प्रवासी नासल्याने सुदैवाने कोणतीही हानी नाही
accident news Mumbai-Bangalore highway driver lost control bus fell into the Mula river Wakad
accident news Mumbai-Bangalore highway driver lost control bus fell into the Mula river Wakad sakal

वाकड : येथील मुंबई-बंगळूर महारार्गावरील मुळा नदी पात्रावर असलेल्या उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून खासगी बस नदी पात्रालगत असलेल्या खड्ड्यात कोसळली. हा अपघात सोमवारी (ता. २३) पहाटे पाचच्या सुमारास झाला. सुदैवाने बसमध्ये कोणीही प्रवाशी नव्हते तसेच बस चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मुंबई-बंगळूर महामार्गावरून मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने बस जात होती. वाकड येथे मुळा नदीवरील पुला जवळ येताच चालकचा ताबा सुटल्याने बस पुलाच्या कठड्याला धडकली. बसचा वेग जास्त असल्याने ती कंट्रोल न झाल्याने बस बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कोणाला काही हानी झाली का किंवा बस मध्ये कोणी प्रवासी नसल्याची खात्री करत दोन क्रेनला पाचारण केले. क्रेनच्या साहाय्याने बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली यावेळी महामार्गावर बघ्यांची तोबा गर्दी झाली होती तर वाहनांच्या रांगा लागू दीड तास वाहतूक कोंडी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com