औरंगाबाद पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ

कुरियर कंपनीत पार्सल आल्या ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान अहमदनगर, औरंगाबादला जाणार होते कुरियर
After Aurangabad Stock of weapons were found in Pimpri Chinchwad
After Aurangabad Stock of weapons were found in Pimpri Chinchwad sakal

पिंपरी : दिघी येथील कुरिअर कंपनीत पार्सलमधून ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन लाख २२ हजारांचा हा शस्त्रसाठा दिघी पोलिसांनी जप्त केला असून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा शस्त्र साठा अहमदनगर व औरंगाबाद येथे कुरियरने जाणार होता. उमेश सूद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद ), मनींदर (रा. अमृतसर, पंजाब), आकाश पाटील (रा. चितली, ता. राहता, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीत तलवारीचा साठा आढळून आला होता.

या पार्श्वभूमीवर कुरिअर कंपनीत येणाऱ्या सर्व पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाऊनमधील माल एक्स-रे मशीनमधून स्कॅन करत होत्या. डीटीडीसी कुरिअर कंपनीचे दिघी येथे वितरण केंद्र असून तेथे गोडाऊन आहे. येथून पाच जिल्ह्यात कुरियर जाते. दरम्यान, आरोपी उमेश याने आरोपी अनिल याला दोन लाकडी बॉक्स डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये पार्सल पाठविले होते. हे बॉक्स १ एप्रिलला एक्स-रे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासले असता त्यामध्ये तलवार सदृश्य वस्तू आढळल्या. त्यानुसार, पोलिसांनी दोन लाकडी बॉक्सची तपासणी केली असता ९२ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान असा ३ लाख ७ हजारांचा मुद्देमाल सापडला.

तसेच मनींदर याने आकाश पाटील याला एका बारदानच्या कापडामध्ये पार्सल पाठवले होते. रविवारी (ता. ३) बारदानाच्या कापडातील या पार्सलची एक्स-रे स्कॅनिंग मशिनद्वारे तपासणी केली असता त्यामध्येही तलवार सदृश वस्तू आढळल्या. यातून पोलिसांनी पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी जप्त केल्या.

''हा शस्त्र साठा अहमदनगर व औरंगाबाद येथे कुरियरने जाणार होता. शहरात निवडणुकीच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा सापडला असून ही गंभीर बाब आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का?'' याचा शोध पोलिस घेत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com