मातृत्वाला तिसरा पर्याय; आईनेच दिले लेकीला  गर्भाशय

मातृत्वाला तिसरा पर्याय; आईनेच दिले लेकीला गर्भाशय

''मला आई व्हायचंय. हे माझं स्वप्न आहे. मला सरोगसी नकोय. किंवा दुसऱ्याचं मुलं मला दत्तक म्हणूनही घ्यायचं नाही. या दोन्ही मार्गांनी मला माझं मुलं नकोयं. मी स्त्री आहे. त्यामुळे माझं मुलं माझ्या पोटातूनच जन्मला आलं पाहिजे. यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलेलं. वेगवेगळ्या डॉक्‍टरांकडे जातं होते. हजारो तपासण्या करत होते. हा, पण त्याला शास्त्रीय आधार असायचा. कोणत्याही बाबा-बुवाकडे मुलं होण्यासाठी गेले नाही, की कोणत्या देवाला नवस बोलला नाही. त्यामुळे योग्य दिशेने आम्ही मुलं होण्याचे वेगवेगळे उपचार घेत होतो...'' शिवम्मा बोलत होती. बोलताना तिच्यातील आत्मविश्‍वास दिसत होता. तिच्या विचारातील स्पष्टता शब्दा-शब्दातून कळत होती.

आधुनिक वैद्यकशास्त्रावरचा विश्‍वास तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. ती न थांबता पुढे बोलतं होती, ''वेगवेगळ्या डॉक्‍टरांकडून वंध्यत्वाचे उपचार घेत होतो. त्यात अनेकदा अपयश यायचे. पण, त्या अपयशाने निराश व्हायचे नाही. खचून जायचे नाही की, आपल्याला आपले मुलं होण्याचा ध्यास सोडायचा नाही, हे मनाला पक्क बजावलं होतं. यात संयमाची परीक्षा पावलो-पावली होती. धीर सोडण्याचे प्रसंग प्रत्येक क्षणाला पुढे येत होते. या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची प्रचंड ऊर्जा मला मिळत होती ती, "आपलं मुलं आपल्या उदरातून जन्मणार' या एकाच आशेतून! ही आशाच खऱ्या अर्थाने उर्जास्त्रोत होती माझ्यासाठी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com