#Bappa Morya गणेशभक्तांनी वाजत-गाजत दिला बाप्पांना निरोप

Ganpati-Visarjan
Ganpati-Visarjan

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ च्या घोषात बॅन्डच्या सुरावटीत व ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढून काही सोसायट्यांच्या मंडळांनी तसेच नागरिकांनी घरच्या बाप्पाला, पाचव्या दिवशी भाद्रपद शुद्ध अष्टमीला (ता. १७, सोमवारी) वाजत गाजत निरोप दिला.

नदीपात्रापेक्षाही हौदातील स्वच्छ पाण्यातच श्रींच्या मूर्तींचे करण्यास बहुतांश पुणेकरांनी प्राधान्य दिले. 

मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नागरिकही गेल्या काही वर्षांपासून हौदातील पाण्यात विसर्जनास प्रतिसाद देऊ लागले आहेत. त्यामुळे नदीपेक्षा हौदावरच नागरिक बहुसंख्येने दिसत होते. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येक घाटावर आरोग्य निरीक्षकांसह कर्मचारी नेमले आहेत. अग्निशामक दलातर्फे जवान व जीवरक्षकांची नेमणूक केली आहे. वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाट, नेने घाट, नटेश्‍वर घाट, अष्टभूजा घाट, पांचाळेश्‍वर घाट यासारख्या विविध घाटांवर दिवसभर विसर्जनासाठी नागरिक येत होते. सायंकाळी चारनंतर मात्र विसर्जनासाठीची नागरिकांची गर्दी वाढू लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com