Ganesh Festival : महिला शक्तीचे दर्शन

तुळशीबाग - तुळशीबाग गणपती उत्सव मंडळाच्या श्रींसमोर अथर्वशीर्ष पठण करताना महिला.
तुळशीबाग - तुळशीबाग गणपती उत्सव मंडळाच्या श्रींसमोर अथर्वशीर्ष पठण करताना महिला.

पुणे - आनंद, प्रसन्नता, चैतन्याचा स्त्रोत असलेल्या श्री गजाननाच्या समोर नतमस्तक होत महिलावर्गांतर्फे अथर्वशीर्षाचे पठण अनेक  मंडळांमध्ये होत आहेत. या माध्यमातून समूहशक्तीचे प्रदर्शन घडत आहे.

गणेशोत्सावानिमित्ताने स्त्री शक्तीचे संघटन कौशल्यही नजरेत भरत आहे. तसेच सामूहिकरीत्या एकदा किंवा ११ किंवा २१ आवर्तनांद्वारे स्त्रिया अथर्वशीर्षातून गणेशस्तुतीची आवर्तने घडवीत आहेत. 

गणेश चतुर्थीपासून सुरू झालेले महिलांच्या समूहशक्तीचे दर्शन घरोघरी तसेच गणेश मंडळांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत पाहायला मिळणार आहे. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींच्या समोर दरवर्षी ऋषिपंचमीला २५ हजारांहून अधिक महिला अथर्वशीर्षाचे पठण करतात. या समूहशक्तीतून अनेक स्त्रियांनी प्रेरणा घेतली. काहींनी तर संस्कार वर्गात प्रवेश घेऊन अथर्वशीर्ष म्हणायचे कसे? पाठांतर करताना अथर्वशीर्षांतील ऋचा व त्यांचे स्वर आणि उच्चारदेखील महिला जाणून घेऊ लागल्या आहेत.
दहा- पंधरा जणी असोत की त्यापेक्षा अधिक महिलांचा समूह असो.

मंडळांच्या आमंत्रणानुसार आणि वेळप्रसंगी स्वतःहूनदेखील महिला अथर्वशीर्ष पठणाची इच्छा व्यक्त करू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक मंडळांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत एकदा तरी अथर्वशीर्ष पठणाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. काही मंडळांनी उत्सवातील एक दिवस महिलांकडे संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यास सुरवात केली आहे.

स्वप्नाली पंडित म्हणाल्या, ‘‘मानाच्या चौथ्या गणपतीसमोर आम्ही महिलांनी अथर्वशीर्ष म्हटले तेव्हा मन भरून आले. शब्दातील वर्णन पठणातून होते.’’ अभिनेत्री वाळके म्हणाल्या, ‘‘स्त्रिया जेव्हा त्यांच्या अंतर्मनातील चितंनशक्तीला साद देऊन अथर्वशीर्ष म्हणतात, तेव्हा मनही प्रसन्न होते आणि आनंद व उत्साह जाणवतो.’’

अथर्वशीर्षातील ऋचा म्हणताना त्यांतील शब्द स्वरूप शारदेद्वारे गजाननास महिला त्यांची सेवा वाहतात. तेव्हा मन प्रसन्न होते. आत्मिक समाधान मिळून सकारात्मक ऊर्जा स्त्रोताचीही प्रचिती येते. आम्ही महिला घरोघरीही आलेल्या बोलावण्यानुसार अथर्वशीर्ष म्हणायला जातो. मानाच्या पाचही गणपती मंडळांमध्ये स्त्रिया अथर्वशीर्ष म्हणतात. प्रत्येक मंडळांत तेथील स्थानिक महिलांनी एकत्रित येऊन श्रींच्यासमोर अथर्वशीर्ष म्हणायला हवे.
- वैशाली खटावकर, भाविक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com