देखावे झाले जिवंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - गणेशोत्सवाची ओळख जेवढी त्यातील उत्साही वातावरणात आहे आणि जेवढी बाप्पाप्रती असणाऱ्या भाविकांच्या प्रेमात आहे, तेवढीच ती
आहे दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या जिवंत देखाव्यातसुद्धा! स्थिर किंवा हलत्या देखाव्यांची आपापली बलस्थानं आहेतच. पण भाविक चटकन जोडले जातात, ते जिवंत देखाव्यांशी. नवनव्या कलाकारांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळण्यासोबतच लाखो लोकांपर्यंत पोचण्याची एक संधीही यातून मिळते. म्हणूनच अलीकडच्या काळात जिवंत देखाव्यांची संख्या वाढत चालली आहे. यंदाचा उत्सवही त्याला अपवाद नाही...

जिवंत देखाव्यांची नक्की बलस्थानं काय, त्यांचे महत्त्व काय याविषयी ‘सकाळ’ने गेली १९ वर्षे गणेशोत्सवात देखावे करणारे बहुपेडी कलाकार राहुल भालेराव यांच्याशी संवाद साधला. या वेळी ‘देखावे बघून मिळणारा बौद्धिक-भावनिक खुराक’ हेच जिवंत देखाव्यांचे प्रमुख बलस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. गेली काही वर्षे अनेक संहितांचे लेखन-दिग्दर्शन करण्यासोबतच अनेक संहितांचे ध्वनिमुद्रणही भालेराव यांनी केले आहे. जिवंत देखाव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण मांडतानाच त्यांनी जिवंत देखाव्यांची बलस्थानंही ‘सकाळ’शी बोलताना उलगडून सांगितली.

अतिवैचारिक नसणारी मांडणी, पण त्याचवेळी रंजनातून केलेली सामाजिक प्रबोधनाची पेरणी हे जिवंत देखाव्यांचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. 

गेल्या पाच-सहा वर्षांत जिवंत देखाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हौशी कलाकारांसह नाट्यस्पर्धांतून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक चमू त्यात कार्यरत आहेत, असेही ते म्हणाले.

यंदाच्या वर्षी भालेराव यांनी तीन मंडळांसाठी जिवंत देखावे दिग्दर्शित केले आहेत. नाना हौद तरुण मंडळासाठी सादर केलेला ‘स्वतः’चा विनोदी गोंधळ अर्थात ‘सेल्फी’’ हा जिवंत देखावा आणि नरपतगिरी चौकात ‘स’ हा एक आगळावेगळा जिवंत देखावाही भालेराव यांच्याच लेखन-दिग्दर्शनातून आकारास आला आहे.

जिवंत देखावे - आव्हानं आणि गरज
कलाकारांचे दैनंदिन व्यवस्थापन हे आहे प्रमुख आव्हान
ऐनवेळी निर्माण होणारी समस्या टळावी म्हणून कलाकारांची हवी पर्यायी व्यवस्था
शिस्त आणि टीमवर्क ही मुख्य गरज
जिवंत देखावा एकजिनसी असणे ठरते गरजेचे
कलाकारांच्या अभिनयासोबतच ध्वनिमुद्रणाची गुणवत्ता आणि गोळीबंद संहितालेखन महत्त्वाचे
रंजनातून समाजप्रबोधन हे असावे मूळ