स्वरमंचावर अवतरले 'निरागस सूर' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

पुणे : 'सूर निरागस हो...' हे गायक महेश काळे यांच्या आवाजातील गाणे सादर होते. त्यावेळी ते थेट श्रोत्यांच्या काळजाळा जाऊन भिडत होते. अशीच स्वरांची किमया पुढचे दीड-दोन तास श्रोते अनुभवत होते आणि स्वरांच्या विश्‍वात तल्लीन होत होते. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात महेश काळे यांचे शुक्रवारी गायन सादर झाले. शास्त्रीय संगीतापासून ते चित्रपटात गीतांपर्यंत रंगलेल्या या मैफलीला श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. 

'कट्यार काळजात घुसली'मधील 'घेई छंद मकरंद...' या गीताबरोबरच 'बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'अवघे गरजे पंढरपूर', 'कानडा राजा पंढरीचा' अशा गीतांना रसिकांची विशेष पसंती मिळाली. 'अबीर गुलाल' या गीताने स्वरमैफलीची सुरेल सांगता झाली. प्रसाद जोशी (पखवाज), निखिल फाटक (तबला), सूर्यकांत सुर्वे (तालवाद्य), राजीव तांबे (हार्मोनिअम), रमाकांत परांजपे (व्हायोलिन) यांनी साथ केली.