पालखीत सहभागी होताय; वाहनांची तपासणी करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

‘आरटीओ’चे आवाहन; शनिवारपासून मोफत तपासणी

पुणे - ‘पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करून घ्यावी,’ असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. या वाहनांच्या तपासणीसाठी सुटीच्या दिवशीही आळंदी आणि पिंपरी-चिंचवड येथील आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असून, ती विनामूल्य असेल. 

वाहनचालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तपासणीच्या वेळी आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे बरोबर आणावीत, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. 
संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून पुढील शुक्रवारी (ता. १६), तर आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी शनिवारी (ता. १७) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दरवर्षी पालखीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने सहभागी होतात. 

पालखी मार्गावर अपघात होऊ नयेत, रस्त्यात वाहने बंद पडू नयेत, यासाठी ‘आरटीओ’कडून या वाहनांची तपासणी करून दिली जाते. त्यानुसार या वर्षीही वाहनांची विनामूल्य तपासणी करून देण्यात येणार आहे.

१६ जून पर्यंत सुविधा उपलब्ध
ही तपासणी येत्या शनिवारी (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) कार्यालयीन वेळेत आळंदी आणि पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात करण्यात येईल. १६ जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार अाहे.