felicitation
felicitation

भोर - शंभर टक्के करवसुली केलेल्या ४८ ग्रामपंचायतींचा सत्कार  

भोर (पुणे) : तालुक्यातील १०० टक्के करवसुली केलेल्या ४८ ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसवेक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार पंचायत समितीच्या वतीने करण्यात आला. येथील पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (ता.१०) सकाळी झालेल्या कार्यक्रमात सभापती मंगल बोडके व उपसभापती लहू शेलार यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी गटविकास अधिकारी संतोष हराळे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, शलाका कोंडे, विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य दमयंती जाधव, श्रीधर किंद्रे, पूनम पांगारे, रोहन बाठे, सहाय्यक गटविकास अधिकारी भानुदास साळवे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशपांडे आदींसह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे घरपट्टीची ४ कोटी ९३ लाख रुपये आणि पाणीपट्टीची १ कोटी ५५ लाख रुपये थकबाकी होती. त्यामुळे पंचायत समितीच्या प्रशासनाच्या वतीने वसुलीकँपचे आयोजन केले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली झाली असल्याचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी किलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व मार्गदर्शनामुळे तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात करवसुली झाली असल्याचे माधवनगर-टापरेवाडीच्या सरपंच रेखा टापरे यांनी सांगितले. तसेच पुढील वर्षी सर्वाच्या-सर्व १५५ ग्रामपंचायतींची करवसुली शंभर टक्के करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

वरोडी डायमुख ग्रामपंचायतीने सन २०१७-१८ सालातील वसुली शंभर टक्के करुनही चालू २०१८-१९ सालातीलही वसुली सुरु केली असल्याबद्दल पंचायत समितीच्या 
वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तालुक्यातील शंभर टक्के वसुली केल्याबद्दल

सत्कार झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे - 

साळवडे, सांगवी खुर्द, वाठार हिंगे, न्हावी सर्व्हे नं १५, वरोडी खुर्द, 
वरो़डी डायमुख, सोनवडी, आशिंपी, शिळींब, कोळवडी, राजघर, साळुंगण, वारवंड, करंदी ब्रु., नांद, गुहिणी, भूतोंडे, नायगाव, कुंबळे, मळे, डेहेण, गुणंद, टापरेवाडी, सावरदरे, शिरवली हिमा, दुर्गाडी, भांबवडे, प-हर ब्रु., प-हर खुर्द, साळव, पान्हवळ, सांगवी भिडे, भावेखल, भाबवडी, हातनोशी, सांगवी ब्रु., बसरापूर, रायरी, गुढे, गोरड म्हसवली, म्हसर ब्रु, पांगारी व वाठार हिमा.  शिरवली तर्फे भोर, महुडे ब्रु., आंबेघर, 
कुरुंजी, करंजगाव. 

आमदार संग्राम थोपटे यांची हातनोशी ग्रामपंचायत वगळता तालुक्यातील पंचायत समितीच्या एकाही पदाधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतीची वसुली शंभर टक्के झाली नाही. आमच्या ग्रामपंचायती या मोठ्या असल्याने करवसुली होण्यास विलंब लागत आहे. परंतु आमची वसुली जोरात सुरु असून पुढील काही दिवसात आमच्या ग्रामपंचायतींची शंभर टक्के वसुली होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com