दौंड तालुक्याचा बारावीचा निकाल ८८ टक्के

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 30 मे 2018

दौंड तालुक्यात बारावीचा निकाल ८८ टक्के लागला असून सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या ४३५२ विद्यार्थ्यांपैकी ३८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात उत्तीर्णांपैकी मुलींचे प्रमाण ९४.२६ टक्के तर मुलांचे प्रमाण ८२.८५ टक्के इतके​

दौंड(पुणे) : दौंड तालुक्यात बारावीचा निकाल ८८ टक्के लागला असून सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या ४३५२ विद्यार्थ्यांपैकी ३८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात उत्तीर्णांपैकी मुलींचे प्रमाण ९४.२६ टक्के तर मुलांचे प्रमाण ८२.८५ टक्के इतके आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत दौंड तालुक्याचा सरासरी शेकडा निकाल ८८ टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण झालेल्यापैंकी २५८ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य श्रेणी, १६९३ प्रथम श्रेणी व १७६७ द्वितीय श्रेणी मिळाली आहे. 

सेंट सेबॅस्टियन हायस्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॅालेज (दौंड), कै. बा. वी. राजेभोसले उच्च माध्यमिक विद्यालय (खानवटे), मेरी मेमोरियल उच्च माध्यमिक विद्यालय (गिरीम), नवयुग माध्यमिक विद्यालय (काळेवाडी) , दिवंगत सुभाष बाबूराव कूल विद्यालय, मदरसा इमामदूल उलूम युसुफिया उच्च माध्यमिक विद्यालय, भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय (वायरलेस फाटा-गिरीम) या विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

त्याचबरोबर, काही महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. दत्तकला इंटरनॅशनल उच्च माध्यमिक विद्यालय (स्वामी चिंचोली) - ९६.९६, स्वर्गीय लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालय (दौंड) - ९६.८७, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय (दौंड) - ९५.५३ , कनिष्ठ महाविद्यालय (नानगाव) - ९५.०८, श्री फिरंगाई माता उच्च माध्यमिक विद्यालय (कुरकुंभ) - ९३.४६, मनोरमा मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय (केडगाव) - ९३.१०, श्री गोपीनाथ उच्च माध्यमिक विद्यालय (वरवंड ) - ९२.०७, श्री एन. टी. पवार कनिष्ठ महाविद्यालय (सोनवडी) - ९१.४६, खांबेश्वर शिक्षण संस्था (खामगाव) - ९१.३९, श्रीमती रंभाबाई कटारिया महाविद्यालय - ९०, गुरूदेव दादोजी कोंडदेव उच्च माध्यमिक महाविद्यालय (मलठण) - ८८.०९, विद्या विकास मंदिर (यवत) - ८६.३६, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय (दौंड) - ८५.८४, भैरवनाथ शिक्षण मंडळ (भांडगाव) - ८५.७१, न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय (पारगाव सालू - मालू) - ८५.३६, सरस्वती शिक्षण संस्था (रावणगाव) - ८४.१२, भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय (खुटबाव)- ८४.०६, नागेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय (पाटस) - ८०.६४, श्री सद्गुरू उच्च माध्यमिक विद्यालय (देऊळगाव गाडा) - ८०.५५, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय (कानगाव) - ८०, श्री सिध्देश्वर महाविद्यालय (देऊळगाव राजे) - ७८.६८, स्वर्गीय मा. वि. भागवत महाविद्यालय (पाटस) -७८.६८, कैलास शिक्षण संस्था (राहू) - ७६.२७ , जवाहरलाल विद्यालय (केडगाव)  - ७६.२३, दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय - ५९.

त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचाही निकाल लागला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे. शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय (दौंड) - ९८.६४, दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय - ६०.६०, श्री गोपीनाथ विद्यालय वरवंड -५८.८२, कैलास विद्या मंदीर - ५७.८९. 

Web Title: 12th result declared in daund taluka