स्वाइन फ्लूची १३२ जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

पुणे - स्वाइन फ्लूने अडीच वर्षांच्या मुलीचा बुधवारी मृत्यू झाला. शहरात गेल्या तीन महिन्यांमध्ये १३२ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असून, ३३ रुग्ण यात मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

नगर येथील अडीच वर्षांची मुलगी उपचारांसाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. ताप, थंडी आणि खोकला ही स्वाइन फ्लूची लक्षणे असल्याने २७ मार्चला तिच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्याच दिवशी तिला स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने दिला. उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जानेवारीमध्ये अवघ्या पाच रुग्णांना स्वाइन फ्लू झाला होता. हे प्रमाण मार्चपर्यंत १२१ झाले. स्वाइन फ्लूच्या १८ अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हा रोग झालेल्या १३२ रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. 

शहरातील रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या ३३ पैकी १० रुग्ण हे पुण्यातील होते. उर्वरित २३ रुग्ण हे शहरात उपचारांसाठी आले होते. त्यातील बहुतांश रुग्णांना उशिरा दाखल करण्यात आले होते.

Web Title: 132 persons infected with swine flu