महाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ 

saswad
saswad

सासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील तब्बल १४ हजार २१२ रुग्णांनी तपासणीसह उपचाराचा लाभ घेतला. राज्यभरातून ३१ रुग्णालयांमधील ५१० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग दिला. त्यामुळे प्रथमच एवढे मोठे आरोग्य शिबीर येथे पुरंदर तालुक्यात साकारले.  

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सासवडच्या वाघिरे महाविद्यालयात नियोजनबध्द झालेले हे  शिबीर रुग्णांच्या विक्रमी संख्येचे ठरले. मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांतील तज्ज्ञही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे सासवडमधील आरोग्यतज्ज्ञ संघटनेचेही ६० हून अधिक डॉक्टर्सनी सहभाग दिला. सुव्यवस्थेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शारदानगर शैक्षणिक संकुल, वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थी, नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांची मदत महत्वाची ठरली. विविध रोग, आजाराच्या रुग्णांची गर्दी असूनही नीट नियोजन असल्याने तपासणी, निदान आणि उपचार योग्य वेळेत पार पडले. जि.प.अध्यक्ष विश्वास देवकाते, आरोग्य सभापती प्रविण माने, जिल्हा आरोग्याधिकारी दिलीप माने यांच्यासह जि.प. टिमने शिबीरास हजेरी लावली.  

१७ बालकांवर करणार मोफत शस्त्रक्रिया - रोहीत पवार
शिबीरात १७ बालकांवर तातडीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचे निदान बालरोग व हृदयरोगतज्ज्ञांनी केले. या बालकांवर खासदार सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून मुंबईत मोफत शस्त्रक्रिया होतील, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

आकडे बोलतात..
- शिबीरात तब्बल २ हजार ७२२ रुग्णांना पुढील उपचाराचा सल्ला
- कर्करोगाशी संबंधित १२६ रुग्ण स्पष्ट
- शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची संख्या १५३ व त्याचीही सोय होणार
- ४ हजार १९८ रुग्णांना चष्मे वाटप
- ११०४ रुग्णांची प्रयोगशाळेशी तपासणी झाली
- पहिल्यांदाच रुग्णांसाठी मोफत 60 बसेस व 23 रुग्णावाहिका धावल्या
- नाश्ता, दूध, केळीचाही 18 हजार लोकांना लाभ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com