वेश्या व्यवसायास लावलेल्या तीन मुलींची सुटका

crime
crime

मांजरी (पुणे) : हांडेवाडी रोड येथील संगम सौरभ या लाॅजवर बळजबरीने वेशा व्यवसायास लावलेल्या तीन मुलींची पोलीस कारवाईद्वारे सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत लाॅज व्यवस्थापकासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभाग व हडपसर पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

वेश्याव्यवसाय करून घेणारी शबाना ईलाही दखणी  (वय ३०, रा. कोंढवा)  व लाॅज व्यवस्थापक यासीन इब्राहिम साहेब (वय ३६) या संशयितांना पोलीसांनी आटक केली आहे. संशयीत शबाना ही गेल्या काही दिवसांपासून हांडेवाडी रोड येथील संगम सौरभ लाॅजमध्ये दोन अल्पवयीन मुली व एका सज्ञान महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती रेस्क्यु फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीसांचा सामाजिक सुरक्षा विभाग व हडपसर पोलीसांनी हंडेवाडी येथील संगम लाॅजवर बनावट ग्राहक पाठवून खात्री या प्रकरणाबाबत खात्री केली. त्यानंतर अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला व हाॅटेल व्यवस्थापकाला पोलीसांनी ताब्यात घेतले. 

सुटका करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुली व एका सज्ञान महिलेची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिता खेडकर, महिला उपनिरीक्षक योगीता कुदळे, कल्याणी शिंदे, हवालदार प्रमोद म्हेत्रे, राजेंद्र घोगरे, नामदेव शेलार, सुनील नाईक, कविता नलावडे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com