आंबेगावात 36 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

आंबेगावात 36 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील 103 ग्रामपंचायतींपैकी 36 ग्रामपंचायती 100 टक्के हागणदारी मुक्त झाल्या आहेत. तालुक्‍यात तीन हजार 642 कुटुंबांकडे अजून शौचालये नाहीत. आदिवासी भागातील गावे व अनेक दिग्गज नेत्यांचीच गावे हागणदारीमुक्त योजनेत मागे पडली आहेत. त्यामध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे निरगुडसर व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी-चिंचोडी गावाचाही समावेश आहे.

बागायत क्षेत्रातील गावातील तसेच मोटार सायकल, तीन ते चार मोबाईल वापरत असलेल्या काही कुटुंबांनीही अजून शौचालये बांधली नसल्याची माहिती पुढे आली आहे. जनजागृती व विनंत्या करूनही कुटुंब दाद देत नसल्याने त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी आंबेगाव तालुक्‍यात 67 अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक दिवाळीनंतर कार्यरत होणार आहे. याकामी पोलिसांचीही मदत घेण्याचे नियोजन केले आहे.

हागणदारीमुक्‍त योजनेत मागे राहिलेल्या नेत्यांची गावे पुढीलप्रमाणे ः दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात 67 कुटुंबांकडे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी-चिंचोडी गावात 50 कुटुंबांकडे, सभापती जयश्री डोके यांच्या खडकवाडी गावात 43 कुटुंबांकडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर यांच्या पिंपळगाव गावात 36 कुटुंबांकडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र करंजखिले यांच्या धामणी गावात 29 कुटुंबांकडे, पुणे जिल्हा परिषद सदस्या अलका घोडेकर व पंचायत समिती सदस्य कैलासबुवा काळे यांच्या घोडेगावमध्ये 57 कुटुंबांकडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य सुभाष मोरमारे यांच्या तळेघरमध्ये 54 कुटुंबांकडे, पंचायत समिती सदस्य मनोहर भालेराव यांच्या पेठ गावात 239 कुटुंबांकडे अजून शौचालये नाहीत.
उपसभापती सुभाष तळपे यांचे गोहे बुद्रुक, सरपंच दत्ता गांजाळे यांचे मंचर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांचे अवसरी बुद्रुक, भाजपचे तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांचे कोल्हारवाडी व पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे यांचे कळंब ही गावे 100 टक्के हगणदारीमुक्त झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com