विजय शिवतारे मित्रमंडळाच्या सामुदायिक विवाहात 38 जोडपी विवाहबद्ध

marriage
marriage

सासवड (पुणे) : दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळाच्या वतीने पुरंदर - हवेली तालुक्यातील गरजुंसाठी सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात झाला. कै. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत हे 38 जोडप्यांचे विवाह यात पार पडतात. संसारोपयोगी वस्तुंसह पोषाख व वधूस सोन्याचे मणी मंगळसूत्र व नथही दिली. 

सोहळ्याचे प्रमुख व राज्यमंत्री विजय शिवतारे, पदाधिकारी दिलीप यादव, रावसाहेब पवार, सभापती अतुल म्हस्के यांच्यासह हभप दादा महाराज, आमदार उदय पाटील, शंकर हरपळे, ज्योती झेंडे, शालीनी पवार, दत्ता काळे, रमेश जाधव, नलीन लोळे, अर्चना जाधव, गोरखनाथ माने, राजीव भाडळे, रमेश इंगळे, दादा घाटे, सचिन भोंगळे, दिपक टकले, मंगल म्हेत्रे, डाॅ. अस्मिता रणपिसे आदी उपस्थित होते.  

यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे 11 वे वर्ष होते. मार्च 2008 मध्ये शिवतारेंनी स्वतःचा मुलगा विनयसह 142 जोडप्यांचा शाही सामुदायिक विवाह सोहळा घडविला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढू नये आणि बँका, पतसंस्था किंवा सावकारांच्या कठोर वसुलीस त्यांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून शिवातारेंनी नैतिक जबाबदारी स्विकारत विवाह सोहळ्यास सुरुवात केली होती. यंदा सासवडला (ता. पुरंदर) पालखीतळावर झालेल्या 38 जोडप्यांच्या विवाहात सहभागी नवदांपत्यास मणी मंगळसूत्र, हळदीची साडी, लग्नाचा शालू, नवरदेवाचा सफारी, संसारोपयोगी भांडी, मनगटी घड्याळ, बूट व चप्पल देण्यात आली.

कन्यादान योजनेंतर्गतचा व शासकीय लाभही देण्यात येत आहे. याचबरोबर सर्व वऱ्हाडींना जेवणाची मेजवानी दिली. जेवण, मंडपासह सोहळ्याचा सारा खर्च मित्र मंडळाने केला. विवाहात कुंटे सराफ यांनी खास नथ मोफत दिली. 

23.76 कोटींची समाजाची बचत..
विजय शिवतारे मित्र मंडळांच्या वतीने सोहळ्याद्वारे गेल्या 10 वर्षात 792 वधू - वरांचे संसार उभे करण्याचे काम राज्यमंत्री शिवतारेंनी केले. एका कुटुंबाचा किमान खर्च प्रत्येकी दिड लाख धरला.. तरी 23.76 कोटी रुपयांची समाजाची याव्दारे बचत झाली. तर यंदाची बचत यात भरच घालेल. जो काही खर्च होतो, तो सारा भार शिवतारेच उचलतात, असे अतुल म्हस्के म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com