धुराचे लोट सोडत पीएमपी बसची धाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

वारजे माळवाडी : कोथरूड-वारजे माळवाडी मार्गावर रविवारी दुपारी पीएमपी बस धूर ओकत धावत होती. त्यामुळे रस्त्याने जाणारे दुचाकीस्वार व इतर नागरिकांना या धुराचा त्रास सहन करावा लागला.

अध्यक्षपदी तुकाराम मुंढे आल्यापासून "पीएमपीएमएल'मध्ये विविध सुधारणा होत आहेत; परंतु धूर ओकणाऱ्या बस मात्र अजूनही मार्गावर धावत आहेत. यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.

रविवारी दुपारी सव्वा वाजता कोथरूड येथून निघालेली पीएमपी बस धूर ओकतच वारजे माळवाडीच्या दिशेने जात होती. या बसमागे असणाऱ्या वाहनचालकांना भर उन्हात या धुराचा त्रास सहन करावा लागला.

कोथरूड ते कर्वेनगरकडे जाणारा रस्ता चढाचा आहे. या रस्त्यावर सायलन्सरमधून अक्षरशः धुराचे लोट बाहेर पडत होते. तो थेट दुचाकीचालकांच्या तोंडावर मारा येत होता. वाहनचालक व पादचाऱ्यांना नाकावर हात लावावा लागत होता. धुरामुळे वाहन चालकांना पुढचे काहीच दिसत नव्हते. वारजे माळवाडीतील महामार्ग चौक ते गणपती माथा बस थांब्यापर्यंतही चढ आहे. या रस्त्यावरही अशाच प्रकारे धुराचे लोट वाहत होते.