डिझेल चोरी करणारे ६ आरोपी जेरबंद

arrested.jpg
arrested.jpg

उरुळी कांचन : पुणे-कोल्हापुर रेल्वे मार्गावर वळती (ता. हवेली) हद्दीत रेल्वे ट्रॅक लाईनचे कामासाठी आणलेल्या डिझेलवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामिन पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अऩ्वेशन शाखेला यश आले आहे. पोलस उपनिरीक्षक महेश मुंढे यांच्या नेत्तत्वाखालीस पोलिसांनी नवनाथ दादासाहेब बरकडे (वय १८, रा. तरडे ता. हवेली) या टोळीप्रमुखासह पाच आरोपींना शनिवारी (ता. 21) मध्यरात्री अटक केली असुन, संबधिताकडुन चोरीस गेलेले डिझेलही जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अऩ्वेशन शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. 

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने नवनाथ बरकडे याच्यासह विशाल लक्ष्मण केसकर (वय- 19 वर्षे), सुदाम मल्हारी केसकर (वय- २१ वर्ष), वैभव दिलीप काळे (वय- १९ वर्षे) अक्षय शांताराम टुले (वय- २१वर्षे, रा. वरील पाचही जण तरडे ता. हवेली) यांच्यासह एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलगा वगळता पाचही जणांना अटक करुन, पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यातील विशाल केसकर हा माजी जिल्हा परीषद सदस्य लक्ष्मण केसकर यांचा मुलगा असुन, तो सध्या वाघोली (ता. हवेली) येथील एका अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-कोल्हापुर रेल्वे मार्गावर वळती (ता. हवेली) हद्दीत मागिल कांही दिवसापासुन रेल्वे ट्रॅक लाईनचे काम चालु आहे. हे काम शशिकांत विठ्ठल खरमाटे (रा.चाकण ता.खेड) यांच्या माध्यमातुन चालु आहे. वरील कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी, पोकलेन व हायवा या वाहनांच्यासाठी लागणारे डिझेल इंधन खरमाटे हे लेबर कॅम्प शेजारील बॅरलमध्ये साठा करून ठेवतात. 13 जुलै ला लेबर कॅम्पमधील कामगार झोपले असल्याची संधी साधुत, मध्यरात्री अडीच वाजनेच्या सुमारास चोरट्यांनी बॅरल मधील एकूण ४०० लिटर डिझेल किंमत रुपये २८,४५२/-  चे चोरून नेले होते.

यावेळी चोरट्यांनी खरमाटे यांच्या कामगारावर दगडफेकही केली होती.  दरम्यान हा गुन्हा दाखल हाताच, गुन्हाची व्याप्ती लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांच्याबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेकडुन वरील गुन्हाचा तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस कर्मचारी महेश गायकवाड व निलेश कदम यांना तरडे गावातील नवनाथ बरकडे हा कमी भावात डिझेल विकत असल्याची एका खबऱ्याकडुन बातमी मिळाली असता, या माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता, नवनाथ बरकडे व त्याचे पाच सहा साथीदार यांनीच वळती येथील डिझेल चोसल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. 

या माहीतीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, महेश गायकवाड, निलेश कदम, नितीन गायकवाड, विजय कांचन यांनी शनिवारी रात्री तरडे परीसरातुन नवनाथ बरकडे, विशाल केसकर, सुदाम केसकर, वैभव काळे, अक्षय टुले या पाच जनांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. वरील पाचही जनांच्या अधिक तपास केला असता. सहाही जनांनी वरील चोरीची कप्लना दिली. 

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता...

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ बरकडे व त्याचे वरील पाच सहकारी मागिल वर्षभरापासुन संघटीत चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तरडे येथे नविन भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल, डिझेल ऑईल कंपनीच्या डेपोचे काम चालु आहे. याही कामावर जाऊन नवनाथ बरकडे टोळीने दादागिरी करुन, कामागारांना लुटले आहे. वरील सर्व ठिकाणची माहिती घेण्याचे ताम चालु आहे. यामुळे वरील टोळीकडुन आनखी कांही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com