थेरगावात पाच जणांकडून ६७ लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पिंपरी - गस्तीवरील पोलिसांनी एका वाहनातील ६७ लाखांची रोकड आणि पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, ‘रोकड आमची नाही’ असे ते सांगत आहेत. मग, वाहनातील रोकड नेमकी कोणाची? याबाबत पोलिसांनी तपास चक्र फिरवली आहेत. प्राप्तिकर विभागाचे अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. थेरगाव येथील एका सोसायटीजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

प्रवीण देविचंद जैन (रा. रविवार पेठ, पुणे), सराफाकडील कामगार चेतन ज्ञाताराम राजपूत (वय २४), साईनाथ विठ्ठल नेटके (वय २५, रा. सांगवी), अंकित सुदेश दोषी (वय ४२, रा. अंधेरी, मुंबई) आणि राजीव इंदरमल गांधी (वय २६, रविवार पेठ, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना एका सोसायटीबाहेर रस्त्यावर एक मोटार (एमएच ०२ सीटी ९०९७) उभी दिसली. संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता वाहनामध्ये पाच जण आणि एक बॅग असल्याचे आढळून आले. बॅग उघडली असता आतमध्ये ६७ लाखांची रोकड मिळाली. यामध्ये शंभर आणि दोन हजारच्या नोटा होत्या. ही रक्कम नेमकी कोणाची आहे. तुम्ही कोण आहात? असे पोलिसांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ही रक्कम आमची नाही, आम्ही मुंबईतील व्यापारी आहोत, असे ते सांगू लागले. पोलिसांना संशय बळावल्याने पाच जणांना ताब्यात घेतले. प्राप्तिकर विभाग अधिकारी पाच जणांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी करीत होते.

Web Title: 67 lakh cash seized five people