76 लाख हेक्‍टर क्षेत्र लवकरच सिंचनाखाली - राज्यमंत्री रुपाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पुणे - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सिंचन योजनांना प्राधान्य दिले असून, त्यासाठी 80 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजना लवकरच पूर्ण होत असून, सुमारे 76 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे,'' असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांनी शनिवारी सांगितले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेतर्फे कृषी व्यवस्थापन विषयाच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या पदवीप्रदान कार्यक्रमात रुपाला बोलत होते. केंद्रीय कृषी विभागाचे संयुक्त सचिव डॉ. आशिषकुमार भुतानी, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव गिरीधर पाटील या वेळी उपस्थित होते.

रुपाला म्हणाले, 'अनेक सिंचन योजना तीस वर्षांपेक्षा जास्त काळ अर्धवट स्थितीत आहेत. त्यापैकी लवकर पूर्ण होणाऱ्या 23 योजनांवर प्रथम लक्ष केंद्रित करण्याचे ठरले. सिंचनाखालील क्षेत्र वाढल्यास उत्पादन वाढेल. गोदामे, शेतीमालाची विक्री या बाबींना महत्त्व येईल. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत. अशा वेळी तुमच्यासारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाची देशाला गरज आहे. तुम्हा 63 विद्यार्थ्यांपैकी 60 जणांना नोकरी लागली. असे चित्र मी पहिल्यांदाच पाहिले.''

'गुजरातमध्ये दुधाच्या क्षेत्रात सहकारी संस्थांचे मोठे काम आहे. तरीदेखील अशा संस्थांकडे देशातील दूध उत्पादनापैकी 26 टक्के वाटा येतो. अनेक शहरांत चांगले दूध मिळते की नाही, हे कोणी सांगू शकत नाही. दूध डेअरीच्या सहकार क्षेत्रात काम करण्यास मोठा वाव आहे,'' असेही रुपाला यांनी सांगितले. डॉ. भुतानी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे निबंधक एस. व्ही. देशपांडे यांनी आभार मानले.

Web Title: 76 lakh hector place in irrigation