इंदापूर तालुक्यातील अंगणवाड्यांसाठी 85 लाखांचा निधी

इंदापूर तालुक्यातील अंगणवाड्यांसाठी 85 लाखांचा निधी

वालचंदनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातुन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील अंगणवाड्यासाठी ८५ लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. 

इंदापूर तालुक्यातील चार अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी २४ लाख रुपये मंजूर झाले असुन यामध्ये तरंगवाडी (गावडेवस्ती) , अवसरी (बेडशिंग) ,  कौठळी व शेटफळ हवेली  या अंगणवाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातील ४८ अंगणवाड्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर झाले असुन यामध्ये खालील अंगणवाड्यांचा समावेश आहे. सणसर ( हिंगणेवाडी), वरकुटे खुर्द( मिसाळवस्ती), गोतोंडी मधील शेटेवस्ती व गौतमेश्‍वर, पिंपरी खुर्द (पेटकर वस्ती), वरकुटे खुर्द, रामकुंड, लासुर्णेमधील पाटीलवस्ती, मोहितेवाडी व परीटवस्ती, भाटनिमगाव, वडापुरी,  शिरसटवाडी, शेळगावमधील राऊतमळा, ननवरे मळा व विठोबामाळ, कडबनवाडी (उघडामारुती) , निमगाव केतकी मधील नाळेवस्ती, भोसलेवस्ती, कौठळीमधील काळेलवस्ती व खामगळवाडी, लाखेवाडी, शेटफळ हवेली ( रानमळा), भांडगाव (पाटील वस्ती) वरकुटे बु.मधील करेवाडी व बनकरवाडी, न्हावी, रेडा (देवकर वस्ती ) काटी (भरतवाडी), जंक्शन, भरणेवाडीमधील धापटे वस्ती,  बिरोबावाडी व भरणेवाडी गाव, अंथुर्णेमधील , शिंदेमळा, सावता माळीनगर, रणगाव (गोसावीवस्ती ), कळंब, वीरवस्ती, निरवांगी ( मानेवस्ती), बेलवाडी (जामदारवस्ती), पिंपरी बु.मधील पिंपरी १ व पिंपरी २  , तावशी ( मंडलीक वस्ती ) ,  पवारवाडी, घोलपवाडी ,  निंबोडी ( निंबोडी) ,सपकळवाडी  या अंगणवाड्यांचा समावेश आहे. 

तसेच 33 अंगणवाडीमध्ये शौचालय बांधकामांसाठी प्रत्येकी ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- या अंगणवाड्यांची नावे पुढीलप्रमाणे -

वरकुटे बु.मधील  करेवाडी व बनकरवाडी, न्हावी मधील डोबांळेवाडी व न्हावी गाव, भाटनिमगाव, झगडेवाडी (अभंगवाडी), वडापुरी (रामवाडी) , निमगाव केतकी मधील बारवकरवस्ती व निमगाव केतकी गाव, व्याहळी(तनपुरेवाडी) ,काटी (लक्ष्मीनगर), शिरसाटवाडी, लाखेवाडी , शेटफळ हवेली (रानमळा) , भांडगाव (पाटील वस्ती), अंथुर्णे (सावता माळी नगर),जंक्शन, 

 रुई मधील मराडवाडी व रुई गाव, काझड (रानमळा) , सणसर (हिंगणेवाडी) , पवारवाडी , घोलपवाडी ,  भिगवण,  कळंब मधील ५७ चाळ व भोरकरवाडी ,निमसाखर (कारंडेमळा) , रणगाव - (रत्नपुरी) ,  निरवांगी ( मानेवस्ती), पवारवाडी (मोरेवस्ती), निंबोडी  या अंगणवाड्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com