चारही धरणांमध्ये 95 टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

खडकवासला - खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात मंगळवारी सायंकाळी एकूण पाणीसाठा 27.68 टीएमसी म्हणजे 95 टक्के झाला आहे. 

खडकवासला - खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात मंगळवारी सायंकाळी एकूण पाणीसाठा 27.68 टीएमसी म्हणजे 95 टक्के झाला आहे. 

आज दिवसभर टेमघर येथे 18, पानशेतला 5, वरसगावला 6 व खडकवासला येथे 1 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरण 96.63 टक्के, पानशेत 97.35, वरसगाव 97, तर टेमघर धरण 83 टक्के भरले आहे. खडकवासला धरणातून मंगळवारी सकाळी साडेचार हजार क्‍युसेक पाणी सोडले होते. आज पाऊस नसल्याने धरणातील विसर्ग वाढविला नाही. पानशेत धरणाच्या सांडव्यातून एक हजार 698 क्‍युसेक तर वीजनिर्मितीसाठी 623 क्‍युसेक पाणी सोडले जात आहे. दोन्ही धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. तर टेमघरमधून 200 क्‍युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे.
 
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरण स्थिती
टेमघर- 3.08/82.94
पानशेत- 10.37/97.35
वरसगाव- 12.39/96.63
खडकवासला- 1.84/93.31
चारही धरणांतील एकूण पाणीसाठा 27.68 टीएमसी ः 94.93 टक्के