संतापजनक! अल्पवयीन मुलीवर आजोबासह तीन नातेवाईकांचा बलात्कार

याप्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crime
crimesakal media

पुण्यात ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि सख्खा मामाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत असताना हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rape case)

crime
'भ्रष्टाचारी सरकार पाडण्यासाठी...', चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, मामा यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. २०२० मध्ये पीडित मुलीवर मोठ्या भावाने तिच्यावर जबरदस्ती करत तिला धमकी देखील दिली होती तर आजोबांनी आणि मामांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. हा प्रकार तीन ते चार वर्षापासून सुरु असल्याचे तपासात समोर आले.

crime
..यामुळे मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत असताना अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याचे एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीसांना सांगितले. गेल्या तीन ते चार वर्षापासून वडील, भाऊ, आजोबा, मामा यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. पिडित मुलगी मूळची बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली होती. या घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

crime
Video: भारतातली जनता भाजपलाच निवडून देईल- देवेंद्र फडणवीस

पुण्यात शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप

मागील काही दिवसांपूर्वीपासून शिवसेनेचे (shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर एका तरूणीने बलात्काराचा आरोप केला होता. कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. जर का कुचिकवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्या पिडित मुलीच काही बरं-वाईट झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com