पुण्यात नाटूकली रंगली, छोट्या मुलांनी घेतला नाटकाचा आनंद

गरवारे बालभवन येथे पालक आणि मुलांसाठी ‘मुल साऱ्या गावाचं’ आणि ‘पकडा त्या मांजराला’ या दोन गोष्टींवर आधारित नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
नाटुकली
नाटुकली sakal

नाटुकली म्हणजे सर्वांनाच आवडणारा कार्यक्रम. मुलांना नाटुकली बघण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा याकरिता चिकूपिकू मासिकातर्फे शनिवारी २३ एप्रिल रोजी संध्याकाळी गरवारे बालभवन येथे पालक आणि मुलांसाठी ‘मुल साऱ्या गावाचं’ आणि ‘पकडा त्या मांजराला’ या दोन गोष्टींवर आधारित नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी गरवारे बालभवनच्या संचालिका आणि बालशिक्षण तज्ज्ञ शोभाताई भागवत आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त अरविंद गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती. गोष्टरंग या समूहाचे राम, महेंद्र आणि वर्धन या तिघांनी हे नाटक सादर केले. वयोगट ३ ते १० वर्षाच्या मुलांसाठी हा नाटुकलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे बऱ्याच लहान मुलांचा हा नाटुकली बघण्याचा हा पहिलाच अनुभव होता. (a play was performed at Garware Bal Bhavan)

नाटुकली
नोकरी सोडताना ‘आयटीयन्स’ना करावी लागते कसरत

‘मुल साऱ्या गावाचं’ ही एक आफ्रिकन म्हण आहे. या गोष्टीमध्ये एका मुलीचा लहान भाऊ बाजारात हरवतो, ती तिला त्याला सगळीकडे शोधत असते मात्र दुसरीकडे संपूर्ण गाव त्या मुलाची कशाप्रकारे काळजी घेतं याची ही सुंदरशी गोष्ट. ही गोष्ट लिहिलीय लेखक जेन कोवेन फ्लेचर यांनी आणि या गोष्टीचा मराठी अनुवाद केलाय शोभा भागवत यांनी.

‘पकडा त्या मांजराला’ ही दुसरी गोष्ट या नाटुकलीत सादर करण्यात आली. या गोष्टीत एक खोडकर पण व्हीलचेअरवर सगळीकडे फिरणारी अपंग लहान मुलगी आपल्या मैत्रिणीच्या मांजराला वाचवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करत झाडावर चढते आणि मग सर्वजण तिचे कौतुक करतात तिच्या हिंमतीची ही गोष्ट. ही गोष्ट लिहिलीय लेखिका तारिणी विस्वनाथ यांनी. आणि या गोष्टीचा मराठी अनुवाद केलाय वसुधा अंबिये यांनी. या नाटुकलीचे खास आयोजन शोभाताई भागवत यांच्याकरता करण्यात आले होते.

नाटुकली
महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ध्वजवंदन

नाटकातील प्रत्यक्ष संवाद, गाणी, दृश्य कला यामधून मुलांना वेगळा अनुभव मिळतो. मुलही व्यक्त होतात, आनंद दर्शवतात त्यामुळे असे प्रयोग चिकूपिकूतर्फे नेहमीच आयोजित करण्यात येतात. चिकूपिकू हे मुलांच्या बहुरंगी बुद्धिमत्तावर देत मुलांना गोष्टी, गाणी, अॅक्टिव्हीटीजद्वारे लहान मुलांना नवनवीन गोष्टींची माहिती करवून देणारं मुलांच्या आवडीचं मासिक आहे.

गरवारे येथे सादर करण्यात आलेल्या नाटुकलीतील गाण्यांमध्ये मुलांनीही आनंदाने सहभाग घेतला. मुलांना नुकत्याच शाळेला सुट्ट्या लागल्या आहे आणि अशावेळी लहानमुलांना अगदी जवळून नाटकचा अनुभव घेता आल्यामुळे पालक आणि मुलं दोघेही आनंदी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com