"हृदयाची जोड मिळाल्यास आयुष्य गोड' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - "होईल माझे आयुष्य गोड, जेव्हा मिळेल मला हृदयाची जोड' असे विविध संदेश फलक हाती घेत रविवारी सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आराध्या मुळे या चार वर्षांच्या मुलीला हृदय दान करण्याची साद पुणेकरांना घातली. हृदयाचा आजार झाल्यामुळे आराध्याला हृदय प्रत्यारोपणाची गरज असून, त्यासाठी सोशल मीडियासह राज्यभरात "सेव्ह आराध्या अभियान' राबविले जात आहे. त्याअंतर्गत झालेल्या रॅलीत प्रतिनिधींनी माहिती पत्रकाचे वाटप करत पुणेकरांना आराध्यासाठी हृदय दान करण्याचे आवाहन केले. या सोबतच "अवयवदान हेच जीवनदान' असे फलकही हाती घेऊन त्यांनी अवयवदानाविषयी जागृती केली. 

नवी मुंबईच्या आराध्या मुळे हिला वर्षभरापपूर्वी हृदयाचा आजार (डायलेटेड कार्डिओमायोपॅथी) झाला आहे. तिला त्वरित हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. त्यासाठी राबिवल्या जाणाऱ्या अभियानाचा भाग म्हणून जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकापासून रॅली काढली. पनवेल येथील घाटी मराठी संघटना आणि मी मराठी एकीकरण समितीतर्फे हे अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अक्षय ननावरे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून हृदयशस्त्रक्रिया करवून घेणारी वैशाली यादवही या रॅलीत सहभागी झाली होती. 

आराध्याचे वडील योगेश मुळे म्हणाले, ""आराध्याला हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. यासाठी आम्ही हे अभियान राबवीत आहोत. सोशल मीडियासह राज्यभरात विविध उपक्रमांतून याबाबत आवाहन केले आहे. अनेकांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी आतापर्यंत दाता मिळालेला नाही. नागरिकांनी पुढे येऊन तिच्यासाठी हृदय दान करावे. '' 

तिच्या हृदयाची क्षमता 15 टक्केच 
आराध्या हिच्यावर मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या हृदयाची क्षमता केवळ 10 ते 15 टक्केच आहे. केवळ हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी मुंबईतील विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) कडेही हृदयासाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे तिच्यासाठी नागरिकांना हृदयदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.