लष्करात दुसराही मुलगा जातोय याचा अभिमान

संतोष शाळिग्राम
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - ‘‘लष्करासाठी एक मुलगा आधीच दिलेला आहे. आता दुसराही लष्करात जातोय, याचा खूप आनंद आणि अभिमान आहे,’’ अशी भावना आरती पाटील या मातेने व्यक्त केली.

पुणे - ‘‘लष्करासाठी एक मुलगा आधीच दिलेला आहे. आता दुसराही लष्करात जातोय, याचा खूप आनंद आणि अभिमान आहे,’’ अशी भावना आरती पाटील या मातेने व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यातील पाटील कुटुंब आज खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील दीक्षान्त संचलनासाठी आले होते. त्यांचा समीर हा लहान मुलगा या प्रबोधिनीमध्ये शिकायला होता. तो इंडियन मिलिटरी ॲकॅडमीत (आयएमए) प्रशिक्षण घेऊन वर्षभरानंतर लेफ्टनंट या पदावर रुजू होईल. त्याचा भाऊ सागर यांनीही प्रबोधिनीत शिक्षण घेतले आहे. समीरच्या यशाबद्दल त्याचे वडील व्ही. आर. पाटील आणि आई आरती या दोघांनी समाधान व्यक्त केले. पाटील हे जलसंधारण विभागात शाखा अभियंता आहेत. ते म्हणतात, लष्करात जाण्याचा निर्णय मुलांनीच घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. त्यांना आता यश मिळाले आहे.’’ दोन्ही मुले लष्करात गेलेत. एक आई म्हणून काय भावना आहेत, असे विचारल्यावर आरती म्हणाल्या, ‘‘लष्करात दोन्ही मुले देशसेवा करीत आहेत, याचा खूप आनंद आहे.’’

‘‘लष्करात जाण्याची प्रेरणा भावाकडून मिळाली. शाळेत असतानाही एनडीएबद्दल औत्सुक होते. इथे आल्यानंतर घालविलेली तीन वर्षे आयुष्यातील सर्वांत चांगला काळ आहे. येथून आता लष्करी सेवेत जाणार याचा आनंदच आहे. डेहराडून येथे आयएमए येथील प्रशिक्षणानंतर लष्करात प्रत्यक्षात सेवेत दाखल होईल.’’
- समीर पाटील  

Web Title: Aarti Patil mother expressed her deep feelings that the second son is in the army