आपटाळे-घाटघर रस्त्यावरील मोरी पाण्याखाली गेली 

junnar
junnar

जुन्नर - आपटाळे-घाटघर रस्त्यावरील फांगुळगव्हाण ता.जुन्नर येथील मोरीवरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक आज सोमवारी ता.16 सकाळी बंद झाली. नाणेघाट परिसरात वर्षा विहारासाठी जाणाऱ्यांची तसेच कर्मचारी व नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय झाली. पाच-सहा दिवसांपूर्वी येथील भराव वाहून गेला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून भरावाचे काम पूर्ण करून घेतले तो भराव देखील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे व घाटघर ग्रामपंचायत सदस्य नंदू पानसरे यांनी सांगितले की, रस्त्याचा हा भाग खाली असल्याने पावसाळ्यात दरवर्षी सर्व बाजूने वाहत येणारे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. डोंगर उतारावरून वेगाने पाणी वाहत येत असल्याने पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे रस्ता,भराव खचतो.पावसाचा जोर कायम राहिला तर रस्ता व मोरी वरून पाणी वाहून जात असल्याने वाहतूक बंद पडते. येथे मोठ्या पुलाची गरज असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच फांगुळगव्हाण ते घाटघर हा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीस निरुपयोगी झाला आहे. नाणेघाट येथे येणारे पर्यटक देखील या रस्त्याबद्दल नाराजी व्यक्त करतात रस्त्याचे खडीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने गेल्या दोन वर्षांपासून येथे पूल व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुमारे साठ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव करण्यात आला आहे मात्र निधी उपलब्ध न झाल्याने पुलाचे काम रखडले असल्याचे शाखा अभियंता युवराज मळेकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com