आजार समूळ बरा करण्याची क्षमता आयुर्वेदात - बापट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - ""रुग्णाचा आजार समूळ बरा करण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेदाची ही क्षमता सामान्य रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी या विद्येचा प्रसार झाला पाहिजे. त्यातून आयुर्वेदाला चांगले दिवस येतील,'' असा विश्‍वास राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी व्यक्त केला. 

कोल्हापूर येथील श्री सद्‌गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर न्यासतर्फे आयोजित "आयुर्वेदीय सिद्धांताच्या साहाय्याने चिकित्सक प्रणालीचे सादरीकरण' या विषयावरील श्री विश्व व्याख्यानमालेचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रणजित पुराणिक हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रुकडीकर न्यासाचे आनंदनाथ महाराज सांगवडेकर, माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे (एमसीआयएम) अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, सदस्या अनुपमा शिंपी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे, बैद्यनाथचे भूषण श्रीखंडे, वैद्य समीर जमदग्नी, वैद्य सुकुमार सरदेशमुख, वैद्य दिलीप गाडगीळ, वैद्य अनिल बनसोडे आदी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ""आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीचा इतिहास सांगणारी परंपरा आहे. मात्र, आधुनिक औषधांच्या माऱ्यामुळे आणि कालबाह्य कायद्यांमुळे त्याकडे दुर्लक्ष होत असून, अशा शाश्‍वत आरोग्यसेवेचा लाभ समाजापर्यंत पोचविण्यासाठी कायदे परिवर्तनशील असणे महत्त्वाचे आहे.''