मेट्रोबाबत "पीएमआरडीए'ची बाजी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - मेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बाजी मारली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीच्या इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो प्रकल्पास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिल्याने हा प्रकल्प अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 

पुणे - मेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बाजी मारली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीच्या इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो प्रकल्पास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिल्याने हा प्रकल्प अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 

पुणे महानगराचा गतीने विकास करण्यासाठी सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने "पीएमआरडीए'ची स्थापना केली. एका वर्षातच पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेऊन या मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम दिल्ली मेट्रोला दिले होते. हे काम दिल्ली मेट्रोने तीन महिन्यांत पूर्ण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. 28) मुंबई येथे झालेल्या "पीएमआरडीए'च्या बैठकीत या मार्गास मान्यता देण्यात आली. 

या प्रकल्पासाठी पाच हजार 964 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पीपीपी आणि बीओटी माध्यमातून हा प्रकल्प उभारण्याचा पर्याय "पीएमआरडीए'ने निश्‍चित केला आहे. मार्च 2017 पर्यंत केंद्र सरकारची याला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा असून 2020 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे "पीएमआरडीए'चे उद्दिष्ट आहे. 

मेट्रोचा मार्ग 
हिंजवडी- मेघा पोलिस- विप्रो चौक, शिवाजी चौक, वाकड उड्डाण पूल, बालेवाडी स्टेडियम- विद्यापीठ चौक, आकाशवाणी केंद्र, शिवाजीनगर न्यायालय. येथे पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास हा मार्ग जोडण्यात येणार आहे. 

प्रकल्पातील ठळक बाबी 
- हिंजवडी ते शिवाजीनगर 23.3 किलोमीटर लांबीचा प्रकल्प 
- प्रत्येक हजार मीटरवर मेट्रोचे स्टेशन 
- संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड 
- प्रकल्पाचा खर्च पाच हजार 964 कोटी 
- मार्गावर एकूण 23 स्टेशन 
- शिवाजीनगर न्यायालयाच्या येथे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास जोड 
- हिंजवडी येथील एमआयडीसीच्या 55 एकर जागेवर मेट्रोसाठी डेपो 
- मार्चअखेरपर्यंत केंद्राची मान्यता मिळण्याची अपेक्षा 
- 2020 पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट 
- पीपीपी आणि बीओटीचा पर्याय 

मेट्रोचे प्रस्तावित दर 
0-2 किलोमीटर ः 10 रुपये 
2-4 किलोमीटर ः 20 रुपये 
4-12 किलोमीटर ः 30 रुपये 
12 ते 18 किलोमीटर ः 40 रुपये 
18 किलोमीटरच्या पुढे ः 50 रुपये 

पुणे

पुणे - "मुलगी शिकली, प्रगती झाली...' ही शब्दावली सार्थ ठरवीत अनेक मुलींनी घर,...

03.54 AM

पुणे - मंडप नाही, कसला भपकेपणा नाही, कुण्या पुढाऱ्यांना निमंत्रण नाही, ना कोणाचे...

03.54 AM

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये "सर्टिफिकेट कोर्स ऑन इंटिग्रेटिव्ह...

03.51 AM