सध्याच्या तिकीट दरातच एसी बस सुविधा 

278_500_1508_1338.jpg
278_500_1508_1338.jpg

पुणे : सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना सुचविण्यासाठी उद्योगसमूहांना शहर भारतीय जनता पक्षाने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फोर्स मोटर्सने प्रस्ताव सादर केला. त्यात तिकीट व पासचे शुल्क वाढणार नाही. सध्याच्या तिकीट दरातच प्रवाशांना एसी बसची सुविधा मिळणार आहे. तसेच, हा प्रस्ताव अंतिम नसून नागरिकांनी सूचना केल्यास त्याचाही समावेश त्यात करण्यात येईल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी बुधवारी केले. 

कोथरूड, वडगाव शेरीमधील तीन मार्गांवर मिनी बसद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचा प्रस्ताव "फोर्स'ने गोगावले यांच्या माध्यमातून महापालिकेकडे सादर केला आहे. त्यातील अनेक अटींना पीएमपीनेही विरोध केला आहे. याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये बुधवारी प्रसिद्ध झाले. त्याबाबत गोगावले म्हणाले, ""शहरात 3 हजार बसची आवश्‍यकता असून सध्या फक्त 1450 बस आहेत. या प्रस्तावानुसार पीएमपीला कोणतीही गुंतवणूक न करता फायदा होऊ शकतो. सर्व गुंतवणूक फोर्स करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास निविदा प्रक्रियेद्वारे अन्य कंपन्यांनाही त्यात सहभागी होता येईल.
 
हा करार रद्द करण्याचे सर्व अधिकार पीएमपीच्या ताब्यात असतील. पक्षाने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनानुसार पुणेकरांना सक्षम, स्वस्त व भरवशाची पीएमपी सेवा देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

अध्यक्षांना घरचा आहेर 
भारतीय मजदूर संघाअंतर्गत पीएमपी कामगार संघाने बस मार्गांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला एका निवेदनाद्वारे विरोध दर्शविला आहे. या मार्गांवर पीएमपीने स्वतःच्या बस चालविणे आवश्‍यक आहे. खासगीकरण केल्यास पीएमपीच्या कर्मचाऱ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यातून कामगार कपात होऊन बढत्या थांबण्याची भीती आहे. तसेच, याबाबत कामगार संघटनांना विश्‍वासात घ्यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम लाखवडे आणि सरचिटणीस दीपक कुलकर्णी यांनी केले आहे. पीपल्स युनियनचे संयोजक ऍड. रमेश धर्मावत यांनीही एका निवेदनाद्वारे या प्रस्तावाला विरोध केला आहे. 

गोगावले आज फेसबुक लाइव्हवर 
एसी मिनी बसच्या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले गुरुवारी दुपारी 3 वाजता ई-सकाळच्या फेसबुक पेजवरून पुणेकरांशी संवाद साधणार आहेत. 

या प्रस्तावाबाबत पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासिका प्रांजली देशपांडे आगाशे यांनी "सकाळ'च्या फेसबुक पेजवरून बुधवारी सायंकाळी लाइव्ह चर्चा केली. त्याचा व्हिडिओ पाहा www.esakal.com वर. 

पुणेकरांना मतदानाचे आवाहन 
पीएमपीच्या मार्गांचे खासगीकरण करावे की नाही, याबाबत पुणेकरांना मतदान करता येईल.<

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com