द्रुतगतीवर वाहतूक विस्कळित सहा वाहने एकमेकांवर आदळली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकामागोमाग एक आदळल्यामुळे शनिवारी (ता. 26) दुपारी वाहतूक काही काळ विस्कळित झाली. या अपघातात एक जखमी झाला. वाहतूक पोलिस, आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर तासाभरानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. 

दरम्यान, उन्हाळी सुट्या व वीकेंडमुळे पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे बोरघाटातील वाहतूक सावकाश सुरू आहे. लोणावळा व खंडाळ्यात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, द्रुतगतीवर फुडमॉलजवळ किलोमीटर क्रमांक 37 येथे तीव्र उतार व वळणामुळे चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे सहा वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये चार मोटारी, ट्रक व कंटेनरचा समावेश आहे. अपघातात मोटारींचे बरेच नुकसान झाले आहे. एका वाहनचालकाच्या पायास दुखापत झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धातास विस्कळित झाली होती. 

लोणावळ्यात वाहनांच्या रांगा 
वाहतूक नियंत्रणासाठी लोणावळ्यात तीनच कर्मचारी असल्याने वाहतुकीवर ताण आला होता. उन्हाळी सुट्या तसेच वीकेंडमुळे पर्यटकांच्या गर्दीमुळे बोरघाटात पुण्याकडे येणारी वाहतूक संथगतीने सुरू आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतुकीवर ताण आला. हंगामाच्या सुरवातीस वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळ्यात वाहनांच्या अपोलो गॅरेज ते मुनीर हॉटेलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहने खालापूर टोलनाक्‍याजवळ थांबविल्याने वाहतुकीची अधिक कोंडी टळली. 

Web Title: Accelerated transportation disorder six vehicles hit each other