मित्रावर वार करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यातून फरार

मित्रावर वार करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यातून फरार

पुणे - समलैंगिक मित्रांमध्ये झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी अटकेत असलेला तरुण शौचास जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या तावडीतून पळाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता शुक्रवार पेठेत घडली.

याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक उमाजी राठोड यांनी फिर्याद दिली आहे. ४६ वर्षीय समलैंगिक मित्रावर धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या २३ वर्षीय तरुणास खडक पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, पोलिस कोठडीत असताना त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने फिर्यादी राठोड हे पोलिस कर्मचाऱ्यासमवेत रविवारी रात्री शुक्रवार पेठेतील कमलनयन रुग्णालयात घेऊन गेले होते. डॉक्‍टरांनी तपासणीनंतर औषधे लिहून दिली. पोलिस कर्मचारी औषधे आणण्यासाठी गेले, त्या वेळी संबंधित तरुणाने शौचालयात जाण्याचा बहाणा केला. रुग्णालयाच्या शौचालयामध्ये गेल्यानंतर त्याने खिडकीतून पलायन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com