सहायक आरोग्य निरीक्षकास लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

पिंपरी - हजेरी लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आरोग्य निरीक्षक तानाजी होनाजी दाते (रा. तानाजीनगर, चिंचवड) याला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने (एसीबी) पकडले. शनिवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई झाली.
तानाजी दाते हे भोसरी येथील ‘इ’ प्रभाग कार्यालयात नियुक्तीस आहेत. तक्रारदार आरोग्य विभागातील कर्मचारी असून ते वैद्यकीय रजेवर होते.

कामावर रुजू झाल्यानंतरही त्यांची हजेरी लावली जात नव्हती. हजेरी लावण्यासाठी दाते यांनी कर्मचाऱ्याकडे दहा हजार रुपये देण्याची मागणी केली होती. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर लाच देण्याचे मान्य केले. ती रक्कम सुटीच्या दिवशी शनिवारी (ता. १३) देण्याचे ठरले. दुपारी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दाते यांना पकडले.

महापालिकेत कारवाईचा धसका
आयुक्‍तांचा स्वीय सहायक राजेंद्र शिर्के याला लाच घेताना अटक केल्यानंतर आयुक्‍त व अतिरिक्‍त आयुक्‍त यांच्या कार्यालयात जाणाऱ्यांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेने दोन सुरक्षारक्षकांची नियुक्‍ती केली आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चौकशी केल्यानंतर त्याला कोणाकडे जायचे आहे? काय काम आहे? हे जाणून घेतले जाते. संबंधित कर्मचाऱ्याने परवानगी दिल्यानंतरच नागरिकांना प्रवेश दिला जातो.

Web Title: additional health officer arrested in bribe