माघारीनंतर जुन्नरला सरपंचपदासाठी 11 अर्ज

After the withdrawal Junnar received 11 applications for the post of Sarpanch
After the withdrawal Junnar received 11 applications for the post of Sarpanch

जुन्नर : उमेदवारी अर्ज माघारीनंतर जुन्नरला तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 11 तर 30 सदस्यासाठी 62 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. बेल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक 14 अर्ज दाखल झाले होते. आज 8 जणांनी माघार घेतल्याने प्रदीप पिंगट, वसंत जगताप, नीलम प्रभू गावडे, शंकर शिंदे, राजेंद्र गुंजाळ, विलास डावखर हे सहाजण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 

17 सदस्यांसाठी 89 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 43 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 46 उमेदवार राहिले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी के .डी. भुजबळ यांनी दिली. 

गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने लहू भिमाजी गुंजाळ व किसन भागजी बोरचटे यांच्यात सरळ लढत होत आहे. सदस्यासाठी 24 उमेदवारी अर्जापैकी 6 जणांनी आज माघार घेतली. त्यामुळे 9 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात राहिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. एन. राठोड यांनी सांगितले.

तांबेवाडीच्या सरपंचपदासाठी तीन जणांनी माघार घेतली. आता चंद्रकांत तांबे, अनिल तांबे व तान्हाजी कुंजीर हे तिघे निवडणूक रिंगणात राहिले आहेत. सदस्यासाठीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून एक जागा रिक्त राहिली आहे. उर्वरित चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. खोडदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com