आसिफासाठी नागरिक रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

हडपसर - कठुआतील आसिफा तसेच उन्नाव व सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ ससाणेनगर ते हडपसर पोलिस ठाण्यापर्यंत कॅंडल मार्च काढण्यात आला. पोलिसांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

बलात्कार प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात ६ महिन्यांच्या आत निकाली लावावा. स्त्री चारित्र्याचे धिंडवडे न काढता, जातीचा विचार न करता हा खटला चालवावा आणि कडक शिक्षा करावी, अशी मागणी या वेळी महिलांनी केली. ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंगपासून निघालेल्या मोर्चात लहान मुले, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

सर्वपक्षीय व सामाजिक संस्थांनी काढलेल्या या मोर्चात माजी आमदार महादेव बाबर, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक योगेश ससाणे, साईनाथ बाबर, माजी नगरसेवक फारूक इनामदार, सुनील बनकर, राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष सविता मोरे, आरपीआयच्या शशिताई वाघमारे, काँग्रेसच्या पल्लवी सुरसे, भानुदास शिंदे, महेंद्र बनकर, प्रशांत सुरसे, महेश टेळे, अनिल गोटे, विठ्ठल सातव, संजय शिंदे, सई टेळे आदी सहभागी झाले होते. मोर्चातील महिला व बालिकांनी महिला पोलीस अधिकारी कल्याणी शिंदे यांना निवेदन दिले.

कोंढव्यात विद्यार्थी रस्त्यावर 
कोंढवा : उन्नाव आणि कठुआ येथील घटनेच्या निषेधार्थ पश्‍चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने कोंढवा परिसरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हसन खान कॅम्पसपासून सुरू झालेला मोर्चा भाग्योदयनगरमार्गे व्हॅल्यू मार्ट व पुन्हा हसन खान कॅम्पस येथे आला. संस्थेचे सचिव जुबेर रशीद खान, सदस्या तबस्सम शेख, मुख्याध्यापिका नाझेमा खान, नगरसेवक हाजी अब्दुल गफूर पठाण, नगरसेविका परवीन हाजी फिरोज शेख आदी मोर्चामध्ये सहभागी झाले.

Web Title: agitation justice for aasifa