केवळ दाखविण्यासाठी एसी बंद करायचा का? : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

बारामती शहर : ''बाहेर चाळीसहून अधिक डिग्री सेल्सिअस तापमान असताना केवळ दाखविण्यासाठी आम्ही एसी गाडी असतानाही एसी बंद करून उकाड्यात मरायचे का? आता सगळेच एसी गाडी वापरतात. उन्हाळ्यात एसी गाडीचा एसी वापरला, तर काय हरकत आहे. पण, त्यावरही काहींनी टीका केली. आता त्याला काय करायचं?'' अशा आपल्या नेहमीच्या खास शैलीत अजित पवार यांनी संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

बारामतीत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय ओबीसी जनजागृती अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ''आम्ही एसी बसमधून यात्रा केल्याचा आरोप झाला. आता ज्या बसमधून प्रवास करत होतो, त्याला एसी होता, तर एसी बंद करून उकाड्यात उन्हाने स्वतःला त्रास करून घ्यायचा, कारण बाहेरच्यांना काय वाटेल...अरे काय चाललय?'' 

''सरकार नसलं ना की कितीही घोषणा द्या, तुमचं कोणी ऐकत नाही. घोषणा देऊन आणि भाषण करून आमचे घसे बसले; पण या सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही. आम्ही तर नंतर दहा- दहाच्या ग्रुपने आमदार घोषणा द्यायचो. पहिल्या दहा आमदारांनी दिल्यावर पुढचे दहा आमदार घोषणा द्यायचे. पण, घसा बसूनही सरकारवर काही परिणामच झाला नाही,'' असे अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत सांगितले.

Web Title: Ajit Pawar answers critics of Halla Bol campaign