आघाडीवर आज शिक्कामोर्तब? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

बंडू गायकवाड यांचा "राष्ट्रवादी'त प्रवेश 
कॉंग्रेसचे माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गायकवाड हे मुंढवा परिसरातून 2007 पासून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आहेत. 2012च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर ते उपमहापौर झाले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. नव्या रचनेतील मुंढवा-मगरपट्टा सिटी प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

पुणे - ""महापालिका निवडणुकीत विरोधकांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत बुधवारी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक चर्चा होईल,'' अशी आशा व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी आघाडीचे संकेत दिले. 

जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या शहराध्यक्षा व खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, महापालिकेतील सभागृह नेते बंडू केसमे, नगरसेवक दीपक मानकर आदी उपस्थित होते. पक्षाची "वॉर रूम' उभारण्यास सहकार्य केल्याबद्दल अभय मांढरे यांचा सत्कार करण्यात आला. 

पवार म्हणाले, ""केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विरोधकांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची आमची भूमिका आहे. त्यानुसार कॉंग्रेसबरोबर चर्चाही करण्यात येत आहे. मात्र, जागावाटपाबाबत वेगवेगळी मते असल्याने अद्याप एकमत झालेले नाही; परंतु आघाडी करून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न आहे. याबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. त्यानुसार कॉंग्रेसपुढे नव्याने प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यावरील त्यांच्या अपेक्षा जाणून सकारात्मक बोलणी करू. अंतिम निर्णयाच्या दृष्टीने ही चर्चा होईल.'' 

बंडू गायकवाड यांचा "राष्ट्रवादी'त प्रवेश 
कॉंग्रेसचे माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गायकवाड हे मुंढवा परिसरातून 2007 पासून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आहेत. 2012च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर ते उपमहापौर झाले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. नव्या रचनेतील मुंढवा-मगरपट्टा सिटी प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

पुणे

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख...

10.03 AM

बारामती : 'राज्यात पाऊस होण्यासंबंधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तोंडात...

09.45 AM