सौ सुनार की, एक दादा की! 'PCMC'चा दादा एकच

उत्तम कुटे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पिंपरी : माजी शहराध्यक्ष ,पालिकेतील विरोधी पक्षनेते,माजी विरोधी पक्षनेते यांच्यासह सात नगरसेवक फोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी कॉंग्रेसला 'जोर का झटका...' दिला आहे. तसेच भाउसाहेब भोईरांसारख्या मातब्बर कॉंग्रेस नेत्याला प्रवेश देऊन शहराचे दादा आपणच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. यामुळे पालिकेत सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपलाही त्यांनी इशारा देत सत्तेत येण्याची वाट बिकट असल्याचे सुचित केले आहे.

पिंपरी : माजी शहराध्यक्ष ,पालिकेतील विरोधी पक्षनेते,माजी विरोधी पक्षनेते यांच्यासह सात नगरसेवक फोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी कॉंग्रेसला 'जोर का झटका...' दिला आहे. तसेच भाउसाहेब भोईरांसारख्या मातब्बर कॉंग्रेस नेत्याला प्रवेश देऊन शहराचे दादा आपणच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. यामुळे पालिकेत सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपलाही त्यांनी इशारा देत सत्तेत येण्याची वाट बिकट असल्याचे सुचित केले आहे.

भोईर यांच्या एनसीपी प्रवेशामुळे शहर कॉंग्रेसचे पालिकेतील संख्याबळ निम्याने कमी झाले असल्याने या पक्षाची अवस्था आता शहरात गलितगात्र झाली आहे. पक्षात घुसमट होऊ लागल्याने तसेच वाढही खुंटल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तो घेताना त्यांनी आपल्याबरोबर पक्षातील तालेवार नगरसेवकही आणल्याने शहरात कॉंग्रेसची अवस्था आता दयनीय झाली आहे. राहिलेल्या सातपैकी फक्त दोन नगरसेवक शहराध्यक्षांना मानणारे असून याशिवाय हर्षवर्धन पाटील यांचे एक समर्थक वगळता बाकीचेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे भाजपला जसा पालिकेत सत्तेत येण्यासाठी निकराचा संघर्ष करावा लागणार आहे, तशीच लढाई एकेकाळी शहरात एकेकाळी वैभवास असलेल्या कॉंग्रेसलाही अस्तित्व टिकविण्यासाठी आगामी पालिका निवडणुकीत करावी लागणार आहे.

भोईर यांनी कॉंग्रेस पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे शहरातील राजकारणाला पुन्हा एक कलाटणी मिळाली आहे.शहरातील सर्वात जुना, अनुभवी असा नेता पक्षात आल्याने आगामी पालिका निवडणुकीत एनसीपीच्या दृष्टीने ते हुकमाचा हुकमी एक्का ठरणार आहेते.त्यामुळे  चिंचवड आणि भोसरीच्या भाजप आमदारांनी वाढविलेल्या डोकेदुखीतून काहीसा दिलासाही त्यांना मिळाला आहे. तसेच सत्तेची हॅटट्रिक साधण्याच्या त्यांच्या आकांक्षेला बळही आले आहे.

पालिकेतील सत्तेसाठी आसुसलेल्या भाजपच्या आरोपांना पु्रुन उरेल, असा खमका वक्ता भोईर यांच्या रुपाने एनसीपीत आल्याने त्यांना भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देणे आता सोपे जाणार आहे. तसेच भोईर यांच्या राजकारणातील 25 वर्षे राजकारणातील अनुभवाचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होणार आहे. गेल्या महिन्यात 28 तारखेला भोसरीचे आमदार  महेश लांडगे यांनी एनसीपीसह नऊ नगरसेवकांच्या प्रवेशाचा मेगा इव्हेंट केल्याने एनसीपीला पहिला जोरदार धक्का बसला होता. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे एनसीपीतील समर्थक नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या धक्यातून सावरण्याची मानसिक ताकद भोईर व इतर सहा कॉंग्रेस नगरसेवकांमुळे एनसीपीला आता मिळाली आहे. दुसरीकडे पालिकेत सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपची चिंता वाढली आहे. त्यामुळे सत्तारुढ होण्यासाठी त्यांना नाईलाजाने का होईना शिवसेनेबरोबर युती करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी पुन्हा एकहाती सत्तेत येण्याचा हुरुप वाढल्याने एनसीपीकडून कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्यता दुरावली आहे.

Web Title: ajit pawar proves he is the only dada of PCMC